शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची मदत पोहोचली; अतिवृष्टीची केव्हा मिळणार?

By admin | Updated: February 7, 2015 02:37 IST

१२ हजारांवर अतिवृष्टिग्रस्त शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा.

संतोष येलकर / अकोला:जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून मदतनिधी प्राप्त झाला असला तरी गेल्या जुलै महिन्यात अतवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची मदत अद्याप मिळाली नाही. अतवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाईची मदत केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा जिल्ह्यातील चार तालुक्यांतील अतवृष्टिग्रस्त १२ हजार १६६ शेतकरी करीत आहेत.यावर्षीच्या पावसाळ्यात २२ व २३ जुलै रोजी दोन दिवस जिल्ह्यात अतवृष्टी झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांतील खरीप पिकांना या अतवृष्टीचा तडाखा बसला होता. या चार तालुक्यांमधील २३७ गावांमध्ये १२ हजार १६६ शेतकर्‍यांचे ९ हजार ९६९ हेक्टर ४0 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये ८ हजार २६२ हेक्टर ४३ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर १ हजार ७0६ हेक्टर ९७ आर क्षेत्रावरील पिकांचे पन्नास टक्क्यांच्या आत नुकसान झाले. या पीक नुकसानीचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, कृषी साहाय्यक व ग्रामसेवकांकडून करण्यात आले. अतवृष्टीमुळे झालेल्या या पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत ७ नोव्हेंबर रोजी शासनाकडे सादर करण्यात आला होता. दरम्यान, यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत पहिल्या टप्प्यात गत जानेवारीमध्ये ७५ कोटी ११ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. तसेच ४ फेब्रुवारी रोजी ७५ कोटी ७ लाखांचा मदतनिधी प्राप्त झाला; मात्र सहा महिन्यांपूर्वी अतवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानभरपाईची मदत अद्यापही शासनाकडून प्राप्त झाली नाही. ही मदत शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा मदतीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील अतवृष्टिग्रस्त १२ हजार १६६ शेतकर्‍यांकडून केली जात आहे.दरम्यान अतवृष्टीमुळे गत जुलैमध्ये जिल्ह्यातील चार तालुक्यांत झालेल्या पीक नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून मदतनिधीसाठी शासनाकडे पाठपुरावा होत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सांगीतले.