शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अकोल्यात २७ ते २९ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय 'अँग्रोटेक' कृषी प्रदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 7:07 PM

अकोल्यात राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शनाचे  आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख  यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्या पीठाच्या क्रीडा मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

ठळक मुद्देनवे संशोधन, तंत्रज्ञानाची शेतकर्‍यांना मिळणार माहितीकृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर २७ ते २९ डिसेंबरपर्यंत प्रदर्शन आयोजित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शनाचे  आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख  यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्या पीठाच्या क्रीडा मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात नवे  संशोधन, तंत्रज्ञानाची दालने शेतकर्‍यांना माहितीसाठी ठेवली जाणार आहेत.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, शासनाचा कृषी विभागाच्यावतीने  आयोजित या प्रदर्शनाला दरवर्षी लाखो शेतकरी भेट देऊन संशोधन, तंत्रज्ञान  अवगत करीत असतात. यावर्षी असेच नवे तंत्रज्ञान येथे उपलब्ध असेल.  हवामान बदल आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम यानुषंगाने कृषी विद्या पीठाचे मॉडेल, पानलोट विकास, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पशुपालनाचा  पूरक व्यवसाय, कृषी माल प्रक्रिया उद्योगावर विशेष भर यावर्षी देण्यात आला  असून, शेतकर्‍यांना यासंदर्भात अचूक माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी येथे  तज्ज्ञ शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतील, तसेच शेतकर्‍यांच्या शेतीसंबंधी  उद्भवणार्‍या प्रश्नाचे निरसन करतील. महिला बचत गटांना प्रोत्साहन  देण्यासाठी विशेष दालनाची येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. २७ ते २९  डिसेंबरपर्यंत तीन दिवस चालणार्‍या कृषी प्रदर्शनाची कृषी विद्यापीठाने जय्यत  तयारी केली आहे. यावर्षी मोठे तीन डोम उभारण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर