शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
2
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
3
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
4
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
5
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
6
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
7
‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार
8
जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला
9
मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 
10
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
11
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
12
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
13
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
14
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
15
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
16
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
17
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
18
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
19
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
20
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...

मृतदेहाची अवहेलना केल्याबद्दल अकोटमधील डॉक्टरची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:28 PM

अकोट : अकोट येथील डॉ.कैलास जपसरे एम.डी.(मेडिसीन) यांना अकोट शहर पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनोज प्रभुदास तेलगोटे हा युवक हॉस्पिटलमध्ये मरण पावल्यावरही त्याला आॅक्सिजन लावून अकोला येथे उपचारार्थ पाठवून मृतदेहाची अवहेलना केली. मृताच्या उपचाराच्या कागदपत्रांचे बनावटीकरण करण्यात आल्याच्या आरोपाखाली डॉ.जपसरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने जामीन फेटाळून त्यांची कारागृहात रवानगी केली.

अकोट : अकोट येथील डॉ.कैलास जपसरे एम.डी.(मेडिसीन) यांना अकोट शहर पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अकोट येथील रहिवासी तथा रेल्वे कर्मचारी मनोज प्रभुदास तेलगोटे हा युवक हॉस्पिटलमध्ये मरण पावल्यावरही त्याला आॅक्सिजन लावून अकोला येथे उपचारार्थ पाठवून मृतदेहाची अवहेलना केली, तसेच मृताच्या उपचाराच्या कागदपत्रांचे बनावटीकरण करण्यात आल्याच्या आरोपाखाली डॉ.जपसरे यांच्यावर अकोट शहर पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रभुदास तेलगोटे यांचा मुलगा मनोज याला अकोट येथील जपसरे हॉस्पिटल अ‍ॅण्ड क्रिटिकल केलर सेंटरमध्ये २१ एप्रिल रोजी भरती केले. या ठिकाणी उपचारादरम्यान २२ एप्रिल रोजी मनोजचा मृत्यू झाला. तरीसुद्धा डॉ.कैलास जपसरे यांनी त्याला आॅक्सिजन लावून अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याकरिता नातेवाइकांच्या ताब्यात दिले. नातेवाइकांनी अकोला येथे उपचारार्थ नेले असता, तेथे ईसीजी काढल्यानंतर तो मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशा आशयाची फिर्याद मनोजच्या वडिलांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला ५ मे रोजी दाखल केली. यामध्ये त्यांचा मुलगा मनोज हा रेल्वेमध्ये नोकरीवर लागल्यापासून तर त्याच्यावर करण्यात आलेले उपचार व मृत्यूपर्यंत सविस्तर माहिती फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली. या फिर्यादीवरून अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांनी या घटनेची गांभीर्याने चौकशी केली. या प्राथमिक चौकशीमध्ये डॉ.कैलास देवीदिन जपसरे यांनी मृत मनोज तेलगोटे मरण पावल्यानंतरही त्याला व्हेंटीलेटर व आॅक्सिजन लावून अकोल्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये रवाना करून मृतदेहाची अवहेलना करीत मृताच्या नातेवाइकांच्या भावनांना ठेच पोहोचविली. मृत मरण पावल्यानंतरही उपचाराच्या कागदपत्राचे बनावटीकरण करून सदरचे बनावट कागदपत्रे खरे असल्याचे भासवून गैरहेतूने उपयोग केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फिर्यादीची लेखी तक्रार व बयानावरून आरोपी डॉ.कैलास जपसरे यांच्याविरुद्ध अकोट शहर पोलिसात भादंवि २९७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने जामीन फेटाळून त्यांची कारागृहात रवानगी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)फोटो

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोटdoctorडॉक्टर