नगरसेविकेकडून ४५ क्विंटल गव्हाचे वाटप; गरजवंतांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 04:38 PM2020-04-10T16:38:43+5:302020-04-10T16:38:52+5:30

आठ दिवसांत त्यांनी गरजवंतांना ४५ क्विंटल गहु, तीन क्विंटल तांदूळाचे वितरण केले आहे.

Distribution of 45 quintals of wheat from BJP corporator in Akola | नगरसेविकेकडून ४५ क्विंटल गव्हाचे वाटप; गरजवंतांना मदत

नगरसेविकेकडून ४५ क्विंटल गव्हाचे वाटप; गरजवंतांना मदत

Next

अकोला: कोरोना विषाणुची साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली असून केंद्र सरकारने १४ एप्रिल पर्यंत ‘लॉकडाउन’ घोषित केला. या परिस्थितिमुळे हात मजूरी करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू कुटुंबांना अन्न धान्य देण्यासाठी प्रभाग क्रमांक १९ मधील भाजपच्या नगरसेविका योगिता पावसाळे तसेच त्यांचा परिवार सरसावला. मागील आठ दिवसांत त्यांनी गरजवंतांना ४५ क्विंटल गहु, तीन क्विंटल तांदूळाचे वितरण केले आहे.
कौलखेड येथील पावसाळे कुटुंबिय सरसावले आहेत. मागील आठ दिवसांपासून नगरसेविका योगिता पावसाळे व त्यांच्या परिवाराने प्रभागातील गरजू नागरिकांसोबतच शहरातील खदान, खडकी, उमरी, सोमठाना, हिंगणा आदि भागातील गरजवंतांना गहु आणि तांदूळ वाटप केला. याप्रसंगी तालुका खरेदी विक्री सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष गजाननराव पावसाळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, मारोतीराव पावसाळे, संजय पावसाळे, रवि पावसाळे,गणेशराव पावसाळे, श्रीनिवास पावसाळे ,नाना पावसाळे, प्रशांत पावसाळे,धनंजय पावसाळे, संतोष पावसाळे , संदीप पावसाळे , नंदू भाकरे, प्रमोद खेडकर, गणेशसिंह ठाकुर, बाळु खेडकर, सोपान दांदळे , गजानन महले, रवि जाधव, राजू माणिकराव पावसाळे, पप्पू पावसाळे, निरंजन पावसाळे आदि उपस्थित होते.

Web Title: Distribution of 45 quintals of wheat from BJP corporator in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.