शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा हस्तांतरणाची चर्चा भरकटली

By admin | Updated: August 7, 2014 22:54 IST

मजीप्राला हवे ५00 कोटी; निर्णय अधांतरी

अकोला : शहराची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार ६ ऑगस्ट रोजी ह्यसह्याद्रीह्णअतिथीगृहावर आयोजित करण्यात आलेली बैठक टायटाय फिस्स निघाली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी मजीप्राला ५00 कोटी रुपये देण्याचा मुद्दा उपस्थित करीत मूळ मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या प्रकारावर आमदार गोपीकिशन बाजोरिया, उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी बैठकीतच पक्षाच्या धोरणावर टीका केली. अखेर हस्तांतरणाचा तिढा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीनमध्ये सतत होणारा तांत्रिक बिघाड, पाणीपुरवठा योजनेसाठी तांत्रिक कुशल मनुष्यबळाचा अभाव, शहरातील मुख्य जलवाहिन्यांना लागणार्‍या गळत्या आदी प्रकार थांबविण्यात मनपा अपयशी ठरली. मनपाची एकूण आर्थिक स्थिती लक्षात घेता, ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दा आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात उपस्थित केला. यावर मनपानेदेखील ही योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्याचा ठराव शासनाकडे सादर केल्यानंतर मजीप्राच्या १३२ व्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत ही योजना स्वीकारण्यावर एकमत झाले होते. नुकत्याच १८ जुलै २0१४ रोजी पार पडलेल्या सभेत मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी मजीप्राला ११ कोटी ८0 लाख निधी देण्याचा ठराव पारित करून घेतला. योजना हस्तांतरित करण्याच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्यामुळे त्यांनी या विषयावर ह्यसह्याद्रीह्ण अतिथीगृहावर ६ ऑगस्ट रोजी बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी बैठक पार पाडली. योजना हस्तांतर करण्यापेक्षा मजीप्राचे ५00 कोटी कधी देणार, या मुद्यावर बैठक रेंगाळल्याची माहिती आहे. योजना नफ्यात असेल तरच मजीप्रा परत घेईल,अन्यथा नाही, असा सूर बैठकीत उमटताच आमदार बाजोरिया व उपमहापौर सिद्दीकी यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. बैठकीला महापौर ज्योत्स्ना गवई, प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर, मजीप्राचे कार्यकारी अभियंता एस.हुंगे आदी उपस्थित होते.