शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

वैद्यकीय चाचणीसाठी दिव्यांग वेटिंगवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 14:33 IST

वैद्यकीय चाचण्या होत नसल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्रापासून उपेक्षित राहावे लागत आहे.

अकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांची वैद्यकीय चाचण्यांसाठी चार ते पाच महिने प्रतीक्षेत राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. वैद्यकीय चाचण्या होत नसल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्रापासून उपेक्षित राहावे लागत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगांसाठी दिव्यांग कक्षाची स्थापना होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचण्यांसाठी येथे बोलाविण्यात येते. या वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्यानंतरच दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्या जाते; मात्र मागील काही महिन्यांपासून दिव्यांगांनी आॅनलाइन अर्ज करूनही त्यांना तपासणीची तारीख देण्यात येत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिव्यांग कक्षाकडून कुठल्याच प्रकारचा संदेश न आल्याने बहुतांश दिव्यांग थेट कक्षाला भेट देऊन विचारणा करतात. त्यानंतर त्यांना दोन ते तीन दिवसांनंतरची तारीख दिल्या जाते. ज्या दिव्यांगांनी केंद्राला भेट दिली नाही, त्यांना क्वचितच तपासणीचा दिवस संदेशाद्वारे कळविण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे. या प्रकारामुळे अनेक दिव्यांगांना फटका बसत असून, त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.अजब कारभारामुळे दिव्यांग त्रस्तआॅनलाइन अर्ज करूनही वैद्यकीय चाचणी होत नाही. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष दिव्यांग कक्षाला भेट द्यावी लागत आहे. या ठिकाणी आल्यावर काहींना तपासणीची तारीख दिली जाते, तर काहींना उलटसुलट उत्तरे देत अद्याप तपासणीचा नंबर लागला नसल्याचे सांगण्यात येते. अशा अजब कारभारामुळे एका दिवसाच्या कामासाठी दिव्यांगांना हेलपाटे घेत वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.आॅफलाइन अपॉइंटमेंटमुळे मिळणार दिलासादिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर दिव्यांगांना आता आॅफलाइन अपॉइंटमेंट घेऊन पुढील वैद्यकीय तपासणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मर्यादित कालावधीतच दिव्यांगांची वैद्यकीय चाचणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार आहे; परंतु यासाठी अद्यापही अपंग कल्याण आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाली नाही.

 

टॅग्स :Akolaअकोला