शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

वाळवंटातील घाण वारकरीबाह्य घटकांमुळे !

By admin | Updated: February 28, 2015 00:47 IST

लोकमत मुलाखत; तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज देहूकर महाराजांची माहिती.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा): पंढरपूरच्या वाळवंटात फड उभारून भजन-कीर्तन केल्याने कुठल्याही प्रकारची अस्वच्छता होत नाही; कारण वाळवंटातील घाण ही वारकर्‍यांमुळे होत नसून, ती वारकरीबाह्य घटकांमूळे होते, असे स्पष्ट प्रतिपादन तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज व पंढरपूरचे फडकरी प्रा. बाळासाहेब महाराज देहूकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना केले. मेहकर येथे २७ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. न्यायालयाने वाळवंटातील अस्वच्छतेबाबत थेट वारकर्‍यांनाच सवाल केल्याने पंढरीतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पृष्ठभूमीवर देहूकर महाराज यांनी त्यांचे विचार मांडले.

प्रश्न : पंढरपूरच्या वाळवंटातील घाण कशामूळे होते?-कार्तीकी यात्रेच्यावेळी वाळवंटात होणारी सर्व घाण ही केवळ वारकर्‍यांमूळेच होते, हा गैरसमज आहे. वास्तविक वाळवंटात होणारी ८0 टक्के घाण ही वारकरीबाह्य घटकांमुळे होते. जसे वाळवंटात लागणारी हॉटेल्स व दुकानांचे तंबू, फेरीवाले, फेरीवाल्यांनी तात्पुरत्या मुक्कामासाठी ठोकलेले तंबू, पार्कींगसाठी येणारी वाहने, मोकाट गुरेढोरे आदी घटकांमूळे वाळवंटात घाण पसरते.

प्रश्न : फडांमध्ये कचरा निर्माण होत नाही का?-महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील वारकरी वाळवंटातील फडांमध्ये हजेरी लावतात. त्यामुळे निश्‍चितच कचरा निर्माण होऊ शकतो. या फडांमधून होणार्‍या पंगतीच्या पत्रावळींचा व शिल्लक राहीलेल्या अन्नाचा कचरा ही बाब मान्य आहे. परंतु इतर घटकांपेक्षा फडांमध्ये केवळ २0 टक्के कचरा निर्माण होतो.

प्रश्न : पंढरीच्या वाळवंटातील अस्वच्छतेला आळा कसा बसेल?-फडांमधून होणारा कचरा दूर करण्यासाठी प्रत्येक फडापुढे एक कचराकुंडी ठेऊन त्यातील कचरा दररोज गावाबाहेर हलविला गेल्यास अस्वच्छतेला आळा बसू शकतो. त्याचबरोबर वाळवंटात फिरती शौचालये तयार करून, गावांमध्ये चौकाचौकात शौचालये उभारून वारकर्‍यांच्या शौचविधीची सोय करता येऊ शकते.

प्रश्न : सध्याच्या फिरत्या शौचालयांची काय स्थिती आहे?-कार्तीकी यात्रेला फिरती शौचालये असतात, परंतु त्यात पाण्याची उपलब्धता नसते. त्यातील घाणेची दररोज विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे फिरत्या शौचालयातून दुर्गंधी सुटल्याने वारकरी या शौचालयात जाणे टाळतात. शेवटी याला प्रशासनच कारणीभूत आहे.

प्रश्न : वारकर्‍यांची बाजू समजून घेतली जाते का?-वारकर्‍यांची बाजू समजून घेण्यामध्ये व ती न्यायालयापुढे मांडण्यामध्ये शासन कमी पडत आहे. चंद्रभागेच्या तिरावरील घाण व अस्वच्छतेच्या विळख्याला कारणीभूत ठरणार्‍या अनेक घटकांना दोषी धरण्याऐवजी त्याचे खापर केवळ वारकर्‍यांवर फोडले जाते. वारकर्‍यांच्या शतकानुशतकांच्या परंपरांना बाधा निर्माण करणे म्हणजे ह्यजखम पायाला व पट्टी कपाळालाह्ण असा प्रकार झाला आहे.

प्रश्न : फडाची परंपरा केंव्हापासून आहे?-महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पंढरपूर वारीची पंरपरा ही शेकडो वर्षे जुनी आहे. फडकर्‍यांची वाळवंटात फड उभारून कीर्तन-भजन करण्याची परंपरा ७५0 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे वारकर्‍यांची बाजु समजून घेण्याची गरज आहे.