शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अकोट तालुक्यातील वारकर्‍याचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:55 AM

अकोट : तालुक्यातील संत भास्कर महाराज पायदळ दिंडीसोबत आळंदी येथे गेलेल्या नेव्होरी बु. येथील पांडुरंग विठोबा लोणकर या वारकर्‍याला दुचाकीने उडविले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना औरंगाबाद-नगर मार्गावर ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. 

ठळक मुद्देअहमदनगरजवळ दुचाकीने उडविले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : तालुक्यातील संत भास्कर महाराज पायदळ दिंडीसोबत आळंदी येथे गेलेल्या नेव्होरी बु. येथील पांडुरंग विठोबा लोणकर या वारकर्‍याला दुचाकीने उडविले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना औरंगाबाद-नगर मार्गावर ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य संत भास्कर महाराज यांची कार्तिक वारी आळंदी येथे अकोली जहागीर येथून २२ ऑक्टोबर रोजी रवाना झाली. या पायदळ दिंडीसोबत नेव्होरी बु. येथील ६५ वर्षीय पांडुरंग विठोबा लोणकर हे गेले होते. ३ नोव्हेंबर रोजी अहमदनगरमध्ये पोहचत असताना डीएसपी चौकाजवळ एका दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या पांडुरंग लोणकर यांना सिव्हिल हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर दिंडी ही अहमदनगरमधील माळीवाडा येथे मुक्कामी थांबली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पांडुरंग लोणकर यांचा मृतदेह आणण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष हभप अशोक महाराज जायले व अन्य वारकरी रवाना झाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू