दुचाकीच्या धडकेत जखमी युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:27 IST2019-05-20T12:26:53+5:302019-05-20T12:27:17+5:30

अकोला: राष्ट्रीय महामार्गावर कृषी विद्यापीठासमोर दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा रविवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 The death of the boy injured in accident | दुचाकीच्या धडकेत जखमी युवकाचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत जखमी युवकाचा मृत्यू

अकोला: राष्ट्रीय महामार्गावर कृषी विद्यापीठासमोर दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा रविवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोरील महामार्गावर ११ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास एमएच ३0 टी ९४५१ आणि एमएच ३0 एसी ४१७७ क्रमांकांच्या दोन दुचाकींची जबर धडक झाली. यात शेख इब्राहिम शेख मोबिन (रा. किसान नगर शिवणी) आणि मयूर रामेश्वर धारकर (रा. नागे लेआऊट कौलखेड) हे दोघे जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही दुचाकी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोघाही जखमी युवकांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला; परंतु यातील जखमी शेख इब्राहिम याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

 

Web Title:  The death of the boy injured in accident