शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथील शाकम्बरी इंडस्ट्रिजवर दरोडा

By admin | Updated: August 18, 2014 01:44 IST

३९ हजारांचा ऐवज लंपास;दरोडेखोरांची चौकीदाराला मारहाण, गुन्हा दाखल.

अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पॉइंट परिसरात असलेल्या शाकम्बरी इंडस्ट्रिजवर दरोडेखोरांनी १६ ऑगस्ट रोजी १.४५ वाजताच्या सुमारास दरोडा घातला. यावेळी चौकीदाराला मारहाण करून त्याला शौचालयात बंद केले आणि इंडस्ट्रिजमधील ३९ हजार ६00 रुपयांचा ऐवज लंपास केला.जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, दरोडा, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.पोलिस गस्त घालत असले तरी गुन्हे कमी होताना नाहीत. यापूर्वी पोलिस अधिकार्‍यांनी ठाणेदारांना वाढते गुन्हे कमी होण्यासाठी सूचनाही दिल्या. मात्र तरीही गुन्हे कमी होताना दिसत नाही. शाकम्बरी इंडस्ट्रिजचे सुपरवायझर संतोष साहेबराव रामेकर (३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीदरम्यान चार ते पाच दरोडेखोरांनी इंडस्ट्रिजमध्ये प्रवेश केला. यावेळी इंडस्ट्रिजमध्ये दिनकर प्रल्हाद पागधुने, बाळकृष्ण रावणकर, अनिल ढोले हे कर्मचारी होते. हे तिघे कर्मचारी झोपेत असताना, दरोडेखोरांनी त्यांना उठविले आणि त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण केली. नंतर तिघांनाही शौचालयामध्ये बंद करून ठेवले आणि इंडस्ट्रिजमधील चार ते पाच बॅटरी आणि इतर साहित्य लंपास केले. रविवारी सकाळी इंडस्ट्रिजमधील काही कर्मचारी कामावर गेल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शौचालयातील बंद कर्मचार्‍यांची मुक्तता केली. संतोष रामेकर यांच्या तक्रारीनुसार डाबकी रोड पोलिसांनी दरोडेखोरांविरुद्ध भादंवि कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल केला.