सहा गावांत शेतकऱ्यांनी बंद केला मूग, उडीद, ज्वारीचा पेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:00 IST2018-09-11T12:58:25+5:302018-09-11T13:00:20+5:30

अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये शेतकºयांनी गत पाच वर्षांपासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांची पेरणीच बंद केली आहे.

cultivation of urad and sorghum ban in six villages! | सहा गावांत शेतकऱ्यांनी बंद केला मूग, उडीद, ज्वारीचा पेरा!

सहा गावांत शेतकऱ्यांनी बंद केला मूग, उडीद, ज्वारीचा पेरा!

ठळक मुद्देरामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव इत्यादी सहा गावांमधील शेतकºयांनी सन २०१३ पासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी या खरीप पिकांची पेरणी करणेच बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. हरिणांचे कळप आणि रानटी डुक्कर हैदोस घालून पिकांचे प्रचंड नुकसान करतात.

- संतोष येलकर

अकोला : रानटी डुक्कर आणि हरिणांच्या हैदोसाने होणारे पिकांचे नुकसान आणि या वन्य प्राण्यांच्या जीवघेण्या हल्ल्यांच्या त्रासामुळे अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये शेतकºयांनी गत पाच वर्षांपासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांची पेरणीच बंद केली आहे.
हरिणांचे कळप आणि रानटी डुक्कर हैदोस घालून पिकांचे प्रचंड नुकसान करतात. या वन्य प्राणांच्या हैदोसाने मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी इत्यादी खरीप पिकांचे शंभर टक्के होत असलेले नुकसान आणि वन्य प्राण्यांकडून शेतकºयांवर जीवघेणे हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यात अकोला तालुक्यातील रामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव इत्यादी सहा गावांमधील शेतकºयांनी सन २०१३ पासून मूग, उडीद व हायब्रीड ज्वारी या खरीप पिकांची पेरणी करणेच बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. शेतकºयांनी पेरा बंद केल्याने गत पाच वर्षांपासून संबंधित सहा गावांच्या शेतशिवारांत मूग, उडीद व हायब्रीड ज्वारीचे पीक दिसेनासे झाले आहे. मूग, उडीद, हायब्रीड ज्वारीचा पेरा बंद करून, या भागातील शेतकरी सोयाबीन, कपाशी व तूर इत्यादी खरीप पिके घेत आहेत.

कपाशी पिकाचेही नुकसान;
शेतकरी संकटात!
अकोला तालुक्यातील रामगाव, म्हैसांग, मजलापूर, गोंदामपूर, मुजरे मोहंमदपूर व दहीगाव या गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हैदोसाला कंटाळून शेतकºयांनी मूग, उडीद, ज्वारी पिकाचा पेरा गत पाच वर्षांपासून बंद केला. त्यानंतर आता वन्य प्राणी कपाशी पिकाच्या बोंड्या फस्त करीत आहेत. कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने,या भागातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

चाºयाचा प्रश्न; शेतकºयांवर
जनावरे विकण्याची वेळ
मूग, उडिदासह हायब्रीड ज्वारीचा पेरा बंद केल्याने, संबंधित सहा गावांमध्ये जनावरांच्या चाºयासाठी लागणारा कडबा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये जनावरांच्या चाºयाचा प्रश्न उद्भवत असल्याने, जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

जीव धोक्यात टाकून शेतकºयांनाच
करावा लागतो पिकांचा बचाव!
वन्य प्राण्यांच्या हैदोसापासून पिके वाचविण्यासाठी शासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने, जीव धोक्यात टाकून शेतकºयांनाच पिकांचा बचाव करावा लागत आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात फटाके फोडणे, धुºयावर जाळ करणे इत्यादी उपाययोजना शेतकºयांना कराव्या लागत आहेत.

 

Web Title: cultivation of urad and sorghum ban in six villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.