शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम व-हाडात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 1, 2015 21:11 IST

अकोला जिल्ह्यात रविवार सकाळपर्यंत १९.२९ मिलीमीटर तर वाशिम जिल्ह्यात ७१ मिलीमीटर पावसाची नोंद.

अकोला : गत तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर पश्‍चिम वर्‍हाडात शनिवारी अवकाळी पाऊस झाला. रविवारी दुपारपर्यंत पाऊस सुरुच होता. अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पीक उद्ध्वस्त झाले. पावसाचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा पिकांना बसला. रविवारी पहाटेही अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, आकोट व तेल्हारा तालुक्यातील पिकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला. शेतात सोंगून ठेवलेल्या तूरीचे अतोनात नुकसान झाले. वाडेगाव परिसरातील निंबू बागांचेही प्रचंड नुकसान झाले. पातूर आणि बाळापूर तालुक्यातील आंब्यांचा मोहरही झडला. अकोला जिलत सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १९.२९ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली होती. बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे गहू, हरभरा, मका आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. आंब्यासह फळबागांचेही नुकसान झाले आहे. रविवारीही दिवसभर सुरूच होता. बुलडाणा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा मोताळा, लोणार, सिंदखेडराजा तसेच मेहकर तालुक्यातील काही भागात पिके जमिनीवर आडवी झाली आहेत. खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या भागात पिकांचे नुकसान जास्त आहे. वादळी वार्‍यामुळे विद्युत तार तुटल्याने शॉक लागून माळविहिरी शिवारातील एका म्हशीचा मृत्यू झाला.वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारपासूनच वातावरणात अचानक बदल झाला आणि सायंकाळनंतर वादळी पावसाला सुरूवात झाली. १ मार्च रोजी सकाळी १0 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुके मिळून एकूण ७१ मीमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात १८ मीमी तर त्याखालोखाल रिसोड १५ मीमी, मंगरुळपीर १४ मीमी, मानोरा ११ मीमी, वाशिम १0 मीमी आणि सर्वात कमी मालेगाव तालुक्यात तीन मीमी पाऊस पडल्याची नोंद आहे. अवकाळी पावसामुळे गहु, हरभरा, कांदा बिजवाई, संत्रा व आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.