शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आधी पैसे घेतले; नंतर म्हणाला जा देत नाही! पैसे घेणाऱ्यावर केला हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल

By आशीष गावंडे | Updated: January 24, 2024 18:26 IST

याप्रकरणी सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून २३ जानेवारी रोजी आरोपीविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला: पैशांची उसनवारी करणे एका युवकाच्या अंगलट आली आहे. उधार पैसे घेणाऱ्या युवकाने पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. यातून वाद निर्माण हाेऊन पैसे परत मागणाऱ्या युवकाने फिर्यादीच्या डाेक्यात लाेखंडी पाइपने हल्ला चढवित जखमी केल्याची घटना २१ जानेवारी रोजी माेठी उमरी परिसरात घडली.  याप्रकरणी सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून २३ जानेवारी रोजी आरोपीविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुर राजेश ठाकरे (२८) रा. मते कॉम्पलेक्स, माेठी उमरी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. यातील मारहाण करणारा युवक मंगेश मेहत्रे (१९) रा. कदम मार्केट, हे दोद्येही चांगले मित्र आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार होत असतात. यातील मयूर याने मंगेश याच्याकडून एक महिन्यापूर्वी एक हजार रूपये घेतले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनंतर मंगेशने पैसे परत मागितले. त्यावर फिर्यादीने आरोपीला पैसे नसल्याचे कारण पुढे करून पैसे देत नाही, तुझ्याकडून जे होते ते करून घे,असे बाेलल्यामुळे दाेघांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली हाेती. त्या वादातून मयूरने मंगेशला मारहाण केली होती. २१ जानेवारी २०२४ रोजी रात्री मयूर ठाकरे घराजवळ उभा हाेता. तिथे आरोपी मंगेश मेहगेने मयुरला पैशांची मागणी केली. परंतु सध्या पैसे नसल्याचे मयुरने सांगितले. त्यामुळे संतापलेल्या मंगेशने मयूरच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून जखमी केले. वैद्यकीय अहवाल व सिव्हील लाइन पोलिस स्टेशनमध्ये मयूर ठाकरे याने दिलेल्या तक्रारीवरून मंगेश मेहत्रे याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदिप सिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालोद करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस