शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

विकास कामांचे श्रेय; शिवसेनेत खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 13:53 IST

अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन करणाऱ्या भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला चार हात लांब ठेवणे पसंत केले.

अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन करणाऱ्या भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला चार हात लांब ठेवणे पसंत केले. या प्रकारामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजप समन्वय साधणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने युती असल्याचे जाहीर केले. त्यापूर्वी सत्तेत राहूनही शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका रोखठोकपणे निभावल्याचे चित्र होते. मित्रपक्ष भाजपच्या निर्णयावर शिवसेनेने सतत प्रहार केले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोयाबीन, कापूस, तूर-हरभºयाला हमीभाव मिळत नसल्याचा आरोप करीत भाजपविरोधात राज्यभरात रान पेटविले. सेनेच्या आरोपांना भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जात असल्याने दोन्ही पक्षांत दुरावा निर्माण झाला होता. दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्तेसुद्धा एकमेकांवर तोंडसुख घेत असल्याचे चित्र होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार स्वबळाचा नारा दिल्यामुळे भाजपसोबत पुन्हा युती होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका असो वा नगरपालिकांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे, त्या ठिकाणी विकास कामे करताना मित्रपक्ष शिवसेनेला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. या प्रकाराला जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपालिका व महापालिकासुद्धा अपवाद नाही. महापालिकेत भाजपाचे संख्याबळ ४८ असून, शिवसेनेचे आठ सदस्य आहेत. सत्ता स्थापन करताना भाजपने सेनेला सामावून घेतले नाही. उलट शासन निधीचे वाटप करताना सेनेला पद्धतशीरपणे डावलल्याचे चित्र होते. विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करताना शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवकांना बाजूला सारण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या प्रकारामुळे शिवसेनेत कायम अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. आज रोजी भाजप-सेनेची युती झाली असली तरी शिवसेनेच्या मनातील खदखद कायम असल्याचे बोलल्या जात आहे. यावर भाजपकडून समन्वय साधला जाणार का, आणि कधी, असा सवाल जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे....म्हणून सेनेला दूर केले!भाजपमधील दोन गटांच्या राजकारणात सेनेचा बळी गेल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे काही स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची भाजपमधील दुसºया गटाशी वाढलेली जवळीक तसेच पडद्याआडून होणाºया मदतीमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे. म्हणूनच पक्षांतर्गत विरोधकांसह शिवसेनेला भाजपने दूर लोटल्याचे बोलल्या जात आहे.

अद्याप समन्वय नाहीच!केंद्रात व राज्यात युतीची सत्ता असली तरी महापालिकेच्या राजकारणात भाजपने शिवसेनेची मदत न घेता एकहाती सत्ता स्थापन केली. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामांचा निधी वाटप करताना भाजपने भेदभाव केल्याचा आरोप नेहमीच सेनेकडून करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण अकोला शहराभोवती फिरत असताना शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून आजपर्यंतही समन्वय साधण्यात आला नसल्याची शिवसैनिक ांची खंत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा