शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘पणन’ आता ५० कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:41 IST

कापूस खरेदीचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी अमरावती येथून केला जाणार आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : आधारभूत किमतीने कापूस खरेदी करण्यासाठीची महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने जय्यत तयारी केली असून, ४० ऐवजी आता ५० खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. २१ खरेदी केंद्रे हे विदर्भात असतील. कापूस खरेदीचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी अमरावती येथून केला जाणार आहे. दरम्यान, कापूस खरेदीसाठी शासनाकडून पणन महासंघाला व्याजाने रक्कम दिली जाते. ती दिली की नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.यावर्षी मान्सूनपूर्व कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. आता खरीप कपाशीची वेचणी सुरू असून,अनेक भागात उतारा घटला आहे. बाजारात दरही घटले आहेत. आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५,४५० ते ५,५५० रुपये आहे. याच पृष्ठभूमीवर शेतकरी पणन महासंघाची खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु पणन महासंघ भारतीय कापूस महामंडळाचा उपअभिकर्ता आहे. त्यामुळेच राज्य शासनाकडून ‘पणन’ला ५० कोटी रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. त्या रकमेच्या भरवशावर पणन महासंघातर्फे कोटेशन काढून जी बँक कमी व्याजात मोठी रक्कम देईल त्या बँकेत ५० कोटी जमा करू न पाच म्हणजे दोनशे ते २५० कोटी कर्ज काढून कापूस खरेदी केली जाते; परंतु शासनाने ही रक्कम दिली की नाही, हे अनुत्तरित आहे.असे असले तरी पणन महासंघाने ५० खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, सुरुवातीला ४० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नागपूर विभागात ५, वणी २, अकोला २, अमरावती ५, खामगाव २, यवतमाळ ५, औरंगाबाद ५, परळी ५, परभणी २, नांदेड २ व जळगाव विभागात ५ खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.- कपाशी खरेदी करण्यासाठीची पूर्तता झाली असून, २७ नोव्हेंबरला अमरावती येथून खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. २८ नाव्हेंबरपासून उर्वरित ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.राजाभाऊ देशमुख,अध्यक्ष,पणन महासंघ. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडून व्याजाने पैसे घ्यावे लागतात. ते पैसे बँकेत ठेवून पाच पट रक्क म घ्यावी लागते; परंतु आता काय करण्यात आले, हे सांगता येत नाही.डॉ.एन.पी. हिराणी,माजी अध्यक्ष,पणन महासंघ.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस