शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

१०० काेटींचा खर्च, ४०० पाेलिसांना लक्झरीअस निवासस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST

साडेतीन लाख स्क्वेअर फूट बांधकामावर या आहेत सुविधा तीन लाख ५० हजार स्क्वेअर फुटावर बांधण्यात आलेल्या या इमारतींमध्ये २ ...

साडेतीन लाख स्क्वेअर फूट बांधकामावर या आहेत सुविधा

तीन लाख ५० हजार स्क्वेअर फुटावर बांधण्यात आलेल्या या इमारतींमध्ये २ आणि ३ बीएचके फ्लॅट आहेत़ या निवासस्थानातील रहिवाशांसाठी जिम, गार्डन, मंदिर, आकर्षक झाडे यासह अनेक सुविधा या वसाहतीमध्येच देण्यात आलेल्या आहेत़ ५० ते ६० लाख रुपयांचा फ्लॅट घेतल्यानंतर ज्या सुविधा मिळणार नाहीत त्यापेक्षा अधिक सुविधा या पाेलिस वसाहतमध्ये ठेवण्यात आल्या आहेत़

सात मजल्यांच्या सात इमारती

पाेलिस वसाहतमध्ये भव्य दिव्य अशा सात इमारती असून प्रत्येक इमारत सात मजल्यांची आहे़ काही इमारतीत ३ बीएचके फ्लॅट असून काही इमारतीत २ बीएचके फ्लॅट आहेत़ अकाेल्यात सर्वाधिक उंचीची इमारत म्हणूनही याच इमारतींची आता नाेंद हाेणार आहे़

पाच वर्षांचे मेटनन्स कंपनीकडे

दरम्यान, पाेलिस वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या वसाहतीला बाहेरून किंवा आतून काहीही झाल्यास त्याची दुरुस्ती करून देण्याचे म्हणजेच मेंटनन्सचा पाच वर्षांचा खर्च ही बांधकाम करणारी कंपनी करणार आहे़ तर निवासस्थानाच्या आतमध्ये रहिवाशांनी कुठेही खिळे ठाेकून किंवा रंग खराब केल्यास ती जबाबदारी संबधित पाेलिसांची राहणार आहे़

या मैदांनाचाही समावेश

पाेलिस वसाहतीच्या आतमध्येच कबड्डी, बास्केटबाॅल, व्हाॅलीबाॅल, खाे-खाे, बॅडमिंटन खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले आहे़ या साेबतच २०० मीटर अंतराचा वाॅकिंग ट्रॅकही या ठिकाणी तयार करण्यात आला असून वाचनासाठी लायब्ररी व रीडिंग रूमही बनविण्यात आली आहे़ तसेच काैटुंबिक कार्यक्रमांसाठी फंक्शन हाॅलही या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे़ त्यामुळे ही वसाहत अकाेल्यातील सर्वात भव्य आणि सुंदर असल्याची माहिती आहे़

या अधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांच्या संकल्पनेत तसेच कार्यकाळात सुरू झालेल्या या वसाहतीचे बांधकाम पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहे़ त्यामुळे ही निवासस्थाने लवकरच पाेलिस व त्यांच्या कुटुंबीयांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ तत्कालीन पाेलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनीही ही इमारत तातडीने पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न केले़