शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

CoronaVirus : थुंकल्यास कारवाई; पानठेले बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 2:16 PM

जिल्ह्यातील सर्वच पानठेले ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

अकोला : थुंकीद्वारे विषाणुंचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाईची तरतूद कायद्यात होतीच. त्याची अंमलबजावणी करावी याकडे ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात प्रशासनाचे लक्ष वेधल होते. त्यानुसार, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थेट कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिले. तसेच जिल्ह्यातील सर्वच पानठेले ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.आगामी १५ दिवस कोरोनाचे जास्त संकट आहे. त्यामुळे सावधगिरी बागळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे; परंतु त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकल्यास त्यावर साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला.हा आदेश शहरी भागात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात तहसीलदार व अन्य यंत्रणांना दिला. यासोबतच जिल्ह्यातील सर्वच पानठेले बंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, हा आदेश ३१ मार्चपर्यंत लागू असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी!जिल्ह्यात सर्वत्र तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसही बंदी घातली आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५)च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्याचा इशारादेखील जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस