शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
4
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
5
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
6
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
7
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
8
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
9
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
10
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
11
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
12
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
13
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
14
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
15
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
16
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
17
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
18
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
19
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
20
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून हैदराबादला पायी निघालेली महिला कोरोना संदिग्ध;पातुरवरून अकोला हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 18:48 IST

मुंबईहून पायी निघालेली महिला पातुरात कोरोना संदिग्ध आढळल्यामुळे तीला अकोला येथे हलविण्यात आले.

- संतोषकुमार गवईशिर्ला/पातूर: हैदराबादला घरी जाण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबईहून पायी निघालेली महिला पातुरात पोहोचली. तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली असता संदिग्ध आढळल्यामुळे तिला अकोला येथे हलविण्यात आले. महिलेसह पातुरातील संदिग्धांची सख्या १६ वर पोहोचली आहे. मुंबई येथे राहत असलेली एक ५० वर्षीय महिला ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर हैदराबाद येथे जाण्यासाठी पायी निघाली. मुंबईपासून पायी प्रवास करीत ती पातूरला पोहोचली. येथे तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ती कोरोना संदिग्ध आढळून आली. त्यामुळे तातडीने तिला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गत दोन-तीन दिवसांपासून पातूर शहर मेडशी येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णामुळे प्रकाशझोतात आले आहे. या रुग्णासोबत पंधरा जणांचा थेट संपर्क आल्यामुळे गत दोन दिवसांत पातूरच्या पंधरा कोरोना संदिग्ध यांना अकोला ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये ठेवण्यात आले. त्यांचे स्वॅब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालाची प्रतीक्षा पातूर प्रशासन तथा नागरिक करीत आहेत. गत दोन-तीन दिवसांच्या कोरोना संदिग्ध यांच्या घटनाक्रमाने पातूर तालुका हादरला आहे. सध्या सर्वजण दहशतीखाली वावरताना दिसतात. कोरोनाचे संकट अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. पातूर आणि शिर्ला ग्राम प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना आखल्या असून, संदिग्ध राहत असलेल्या परिसराचे सर्वेक्षण सुरू केले आहे. संदिग्ध रुग्ण जर ‘पॉझिटिव्ह’ निघाल्यास प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये, असे आवाहन शिर्ला ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे आणि पातूर नगर परिषद मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी केले आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPaturपातूर