शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म व शिक्षणात समन्वय हवा

By admin | Updated: January 21, 2015 01:11 IST

सुब्रमण्यम यांचे प्रतिपादन, अकोला येथे स्वामी विवेकानंदांवर राष्ट्रीय चर्चासत्र.

अकोला: स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांतून धर्म, अध्यात्म आणि शिक्षणाचा समन्वय यावर भर दिला होता. आजच्या परिस्थितीत अध्यात्म आणि शिक्षण यांच्यात समन्वय राखला जाणे गरजेचे आहे, असे मत बंगळुरु येथील एस. व्यास विद्यापीठाचे अधिष्ठाता व प्र-कुलगुरू डॉ. के. सुब्रमण्यम यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात ह्यस्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रासंगिकताह्ण या विषयावर मंगळवारी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सुब्रमण्यम बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मदनलाल खंडेलवाल होते. मंचावर अँड. दादा देशपांडे, स्वामी बुधानंद महाराज, प्राचार्य डॉ. जगदीश साबू, समन्वयक डॉ. शिवाजी नागरे, आयोजन सचिव प्रा. डिंपल मापारी उपस्थित होत्या. पुढे बोलताना सुब्रमण्यम यांनी स्वामी विवेकानंदांच्या शिक्षणविषयक मूल्यांचा आढावा घेतला. धर्म आणि शिक्षण यांची सांगड घालून व्यक्तिमत्त्व विकास साधला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना वाव दिला गेला पाहिजे, असेही सुब्रमण्यम यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात मदनलाल खंडेलवाल यांनी स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन सर्वांनी विकास साधावा, असे आवाहन केले. यावेळी स्वामी बुधानंद यांनीदेखील मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चर्चासत्रातील सहभागी प्राध्यापकांच्या निबंधाचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. जगदीश साबू यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डिंपल मापारी यांनी दिला. संचालन डॉ. आरती देशपांडे यांनी केले. आभार डॉ. शिवाजी नागरे यांनी मानले.