Controversy over minor causes; Father kills son | किरकोळ कारणावरून वाद; बापाने केली मुलाची हत्या

किरकोळ कारणावरून वाद; बापाने केली मुलाची हत्या

बोरगाव मंजू (अकोला) : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपोती येथे किरकोळ आर्थिक कारणावरून वाद होऊन बापाने मुलास कुºहाडीने मारहाण केली. त्यातच मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दरम्यान शणीवारी घटनेची फिर्याद दिली वरुन पोलिसांनी बापा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सचिन पळसपगार असे मृताचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आपोती येथील यातील मृतक सचिन भीमराव पळसपगार (२६) ह्याने गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवून आणण्यासाठी वडील भिमराव रंगराव पळसपगार ह्याना पंधरा हजार रुपये मागितले या कारणावरून बाप लेकात वाद निर्माण झाला. रागाच्या भरात बापाने मुलास कुºहाडीने मारहाण केली. त्यातच मुलगा गंभीर जखमी झाला. दरम्यान जखमीस येथील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष यांनी सचिन ह्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरानी सचिन ह्यास मृत घोषित केले. दरम्यान सदर घटनेची फिर्याद बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली वरुन भीमराव पळसपगार यांच्या विरुद्ध गुन्हा कलम ३०२ दाखल करून घटनास्थळावर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, ठाणेदार हरिश गवळी, पोलीस उपनिरीक्षक संतोष आधाव सह पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी सह घटनेतील वापरले हत्यार जप्त करून पुढील तपास ठाणेदार हरिश गवळी, पोलीस उपनिरीक्षक संतोष आधाव सह पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Controversy over minor causes; Father kills son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.