"स्वबळच.. मी नाना आहे, कुणाला दबत नाही!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 09:11 IST2021-09-27T09:11:10+5:302021-09-27T09:11:36+5:30
नाना पटाेले यांचं वक्तव्य. बंदमध्ये सहभागी हाेणार असल्याची माहिती.

"स्वबळच.. मी नाना आहे, कुणाला दबत नाही!"
अकाेला : काँग्रेस पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असे जाहीर केले हाेते, जिल्हा परिषद पाेटनिवडणुकीत त्यानुसार रणनीती आखली आहे. पक्षाची ही भूमिका आहे, ती वारंवार सांगण्याची गरज नाही. मनपा निवडणुकीच्या वेळी त्याबाबत रीतसर बाेलूच. स्वबळाचा मी दिलेला आवाज बुलंदच आहे, ताे काेणीच दाबलेला नाही, मी नाना आहे... काेणाला दबत नाही, अशा शब्दात स्वबळाचा दावा साेडलेला नाही, हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी अधाेरेखित केले.
स्थानिक स्वराज्य भवन येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, प्रभाग रचनेवरून आमचे कुठल्याच पक्षाशी मतभेद नाहीत, महापालिकांसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना जाहीर झाल्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी त्याला विराेध केला. ही भावना आम्ही सरकारपर्यंत पाेहोचविली आहे. ती मान्य हाेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकरी व कामगारविराेधी कायद्यांच्या विराेधात देशभर आंदाेलन पेटले आहे. साेमवारी भारत बंदची हाक दिली असून मी अकाेल्यातील बंदमध्ये सहभागी हाेईन, अशी माहिती त्यांनी दिली.