शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपासमोर काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: January 21, 2015 01:00 IST

विकासकामे सुरू करण्याची मागणी.

अकोला : तत्कालीन काँग्रेस सरकारने शहर विकासासाठी दिलेल्या १0७ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात प्रशासन व सत्ताधारी भाजप-शिवसेना जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने मनपाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अकोलेकर प्रचंड वैतागले असताना प्रशासनाने विकासकामे सुरू करण्यासंदर्भात वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. शहरातील मुख्य मार्गावरील बहुतांश पथदिवे नादुरुस्त आहेत. रस्त्यांवर प्रचंड धूळ, साफसफाईअभावी घाणीने गच्च भरलेल्या नाले-गटारे व जलवाहिन्यांमधून लाखो लीटर पाण्याची नासाडी पाहता, मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजप-शिवसेना अकोलेकरांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसचे शहर अध्यक्ष मदन भरगड यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर मदन भरगड यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांंनी प्रशासन व सत्ताधार्‍यांच्या विरोधात निदर्शने केली. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा, शेतकर्‍यांना आर्थिक मदत घोषित करा, नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदी रद्द करीत मनपाला प्राप्त झालेल्या १0७ कोटींची विकासकामे त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मनपाच्या साहाय्यक आयुक्त माधुरी मडावी यांना काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले.