Akola Mayor: भाजपचा महापौर होताच काँग्रेस आक्रमक, सभागृहातच एमआयएमच्या नगरसेवकांवर फेकल्या बांगड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:26 IST2026-01-30T14:21:22+5:302026-01-30T14:26:38+5:30

Akola Mayor Election News: अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड होताच काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली आणि एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या.

Congress becomes aggressive as soon as BJP becomes mayor, bangles thrown at MIM corporators in the assembly itself! | Akola Mayor: भाजपचा महापौर होताच काँग्रेस आक्रमक, सभागृहातच एमआयएमच्या नगरसेवकांवर फेकल्या बांगड्या!

Akola Mayor: भाजपचा महापौर होताच काँग्रेस आक्रमक, सभागृहातच एमआयएमच्या नगरसेवकांवर फेकल्या बांगड्या!

अकोला महानगरपालिकेच्या महापौर निवडीत राजकीय समीकरणे बदलल्याने सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपच्या शारदा खेडेकर यांची महापौरपदी निवड होताच, काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. एमआयएमने ऐनवेळी घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला.

महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडेकर आणि ठाकरे गटाच्या सुरेखा काळे यांच्यात थेट लढत होती. शारदा खेडेकर यांना ४५ तर सुरेखा काळे यांना ३२ मते मिळाली. १३ मतांच्या फरकाने खेडेकर विजयी झाल्या. सुरुवातीला एमआयएमचे नगरसेवक काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत जातील अशी शक्यता होती. मात्र, मतदानाच्या वेळी एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिले, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला.

एमआयएमने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या गोटात संतापाची लाट उसळली. काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमवर 'भाजपची बी-टीम' असल्याचा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली. तर, काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांच्या अंगावर बांगड्या फेकल्या.  दुसरीकडे, एमआयएमच्या नगरसेवकांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपल्याला धमक्या दिल्याचा दावा एमआयएमकडून करण्यात आला आहे.

भाजपच्या विजयापेक्षा या निवडीनंतर झालेल्या राड्याचीच चर्चा अधिक रंगली आहे. एमआयएमच्या तटस्थ राहण्याने महाविकास आघाडीच्या रणनीतीला सुरुंग लागला असून, यामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

Web Title : अकोला: बीजेपी की जीत पर कांग्रेस का हंगामा; एमआईएम पार्षदों पर चूड़ियाँ फेंकीं

Web Summary : अकोला में बीजेपी के मेयर चुनाव जीतने पर हंगामा हुआ। एमआईएम की तटस्थता से नाराज कांग्रेस पार्षदों ने एमआईएम सदस्यों पर चूड़ियाँ फेंकीं और उन पर बीजेपी की बी-टीम होने का आरोप लगाया।

Web Title : Akola: Congress Agitated as BJP Wins; Bangles Thrown at MIM Corporators

Web Summary : Chaos erupted in Akola as BJP won the mayoral election. Congress corporators, angered by MIM's neutrality which helped BJP, threw bangles at MIM members, accusing them of being BJP's B-team.