शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
4
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
5
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
6
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
7
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
8
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
9
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
10
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
11
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
12
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
14
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
15
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
16
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
17
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
18
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
19
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
20
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
Daily Top 2Weekly Top 5

पाम तेल, दूध पावडरची भेसळ करून बनविलेल्या मिठाईचा साठा जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:31 IST

जप्त केलेल्या मिठाईच्या साठ्याची किंमत १ लाख १७00 रुपये आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पाम तेल व दूध पावडरची भेसळ करून बनविलेल्या ६८0 किलोची निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी जप्त केला. जप्त केलेल्या मिठाईच्या साठ्याची किंमत १ लाख १७00 रुपये आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांना हरिपेठेतील एका घरामध्ये निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा साठा दडवून ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हरिपेठेतील हनुमान मंदिराजवळील आरोपी शुभम श्यामशरण पांडे याच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान घरात राधाकृष्ण बँ्रड नावाने इंडियन मिल्क स्वीट मिठाईचे पाकिटे आढळून आली.विशेष म्हणजे, ही मिठाई खव्यापासून न बनविता, पाम तेल व दूध पावडरची भेसळ तयार करून बनविण्यात आल्याची माहिती आरोपी शुभम पांडे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना दिली. हे भेसळ केलेले पदार्थ आरोपी शहरातील स्वीट मार्ट व्यावसायिकांना मावा म्हणून विक्री करीत होता. आतापर्यंत त्याने हजारो किलो ही बनावट मावा व्यावसायिकांना विकला आहे. त्याच्याकडील मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आरोपीकडून १ लाख १७00 रुपये किमतीची बनावट मिठाई जप्त करण्यात आली आहे.  जागो ग्राहक जागो...

  •  दिवाळी उत्सवादरम्यान अनेक स्वीट मार्ट व्यावसायिक बनावट खव्याचा वापर करून मिठाई तयार करतात आणि विकतात. रासायनिक प्रक्रिया, रंगांचा आणि दूध पावडरचा वापर करून बनावट खवा तयार करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात.
  •  
  •  दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध प्रकारच्या मिठाईला मोठी मागणी असते. या मिठाईसाठी लागणारा खवा कमी पडतो. म्हणून बनावट खव्याचा वापर मिठाईत केला जातो. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून, दूधापासून तयार करण्यात आलेल्या खव्याची दर्जेदार मिठाईच खरेदी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त लोभसिंग राठोड, अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे, गजानन गोरे, सहायक नरवणे यांनी केले.
टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी