शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

ज्येष्ठ नागरिकांची काळजी अन् घुसमटही वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:04 PM

कोरोनाची भीती अन् घरात राहून प्रतिकारशक्ती कमी होणार नाही, याची काळजी घेण्याची चिंता या सर्व प्रकारात ज्येष्ठांची घुसमट वाढत आहे.

अकोला : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले, तेव्हापासून ज्येष्ठ नागरिकांना घरात बंदिस्त व्हावे लागले. कोरोनासोबतच जगायची मानसिकता ठेवून आता सारेच कामाला लागले आहेत. सरकारही अनलॉकच्या प्रक्रि येत हळूहळू बंधने शिथिल करत आहे. विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शाळाही सुरू आहेत. अपवाद केवळ ज्येष्ठ नागरिकांचा आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध आहेत. बाहेर निघाल्यास कोरोनाची भीती अन् घरात राहून प्रतिकारशक्ती कमी होणार नाही, याची काळजी घेण्याची चिंता या सर्व प्रकारात ज्येष्ठांची घुसमट वाढत आहे.कोरोनापूर्वी मैदान, बाग, ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा केंद्रात सगळे एकत्र जमायचे, मोकळ्या वातावरणात गप्पा मारायचे, त्यामुळे मन मोकळे व्हायचे. एकमेकांची आस्थेने विचारपूस, सुख,दु:ख वाटून घेत होते. शरीराबरोबर मानसिक स्वास्थ्यही जपले जायचे. आता सगळेच बंद झाले आहे. अनलॉकमुळे काही प्रमाणात सकाळी संध्याकाळचे फिरणे सुरू झाले असले, तरी शारीरिक अंतर पाळत कुणाचाही संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची चिंता कायमच आहे.वाचन, लेखन, आवडीचे छंद यांसारख्या गोष्टीही वारंवार करून कंटाळा आला आहे. काही कुटुंबांमध्ये ज्येष्ठांची काळजी घेतली जात असली तरी काहींमध्ये भांडणतंटेही होत आहेत. अकोल्यातील उमरी परिसरातील एका भांडणात तर थेट उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकाराचा वापर करून ज्येष्ठांच्या अधिकाराचे संरक्षण करावे लागले. त्यामुळे काही कुटुंबातील कलहामुळेही अनेकांना बाहेर पडायचे आहे; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना बाहेर पडता येत नाही. केवळ रुग्णालयात जाण्यासाठीच ते बाहेर पडत आहेत; मात्र यावेळीही त्यांच्या मनात कोरोनाची भीती कायमच आहे. मोबाइलचा वापर वाढला!काही ज्येष्ठांनी अँड्रॉइड मोबाइल वापरण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. ज्येष्ठ नागरिक संघानेही व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करून आपल्या सदस्यांना सूचना देण्याचा, संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दूरचित्रवाणीचा आधारदूरचित्रवाणी हे विरंगुळ्याचे चांगले साधन ज्येष्ठांसाठी ठरत असले तरी डोळ्याच्या आजारांमुळे दूरचित्रवाणी पाहाण्यावरही बंधने येतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला