पार्श्वगायक सोनू निगमविरुद्ध पोलिसांत तक्रार

By Admin | Updated: April 19, 2017 22:54 IST2017-04-19T22:54:33+5:302017-04-19T22:54:33+5:30

अकोला : प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याने विशिष्ट धर्माबद्दल अनुद्गार काढल्यामुळे त्याच्याविरुद्ध अकोल्यातील कोतवाली ठाण्यात एका कार्यकर्त्याने बुधवारी रात्री तक्रार दाखल केली.

Complaint against the playback singer Sonu Nigam | पार्श्वगायक सोनू निगमविरुद्ध पोलिसांत तक्रार

पार्श्वगायक सोनू निगमविरुद्ध पोलिसांत तक्रार

आॅनलाइन लोकमत
अकोला : प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम याने विशिष्ट धर्माबद्दल अनुद्गार काढल्यामुळे त्याच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या म्हणून अकोल्यातील कोतवाली ठाण्यात एका कार्यकर्त्याने बुधवारी रात्री तक्रार दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार ठेवून घेतली असून, सोनू निगमविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
पार्श्वगायक सोनू निगम याने एका धर्माबद्दल टिष्ट्वटरवर आक्षेपार्ह मत मांडले. त्याने मांडलेल्या मतामुळे आणि एका विशिष्ट धर्माबद्दल अशा पद्धतीची टीका केल्यामुळे सोनू निगमला रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्याने टिष्ट्वटरवर मांडलेले मत वृत्तपत्रांमधूनसुद्धा प्रकाशित झाले. त्याने मांडलेल्या मतामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची एका कार्यकर्त्याने बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात केली; परंतु पोलिसांनी या तक्रारीवर रात्री उशिरापर्यंत कोणतीही कारवाई केली नव्हती. एका कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीनुसार सोनू निगम याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Web Title: Complaint against the playback singer Sonu Nigam