शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता संपली, तरीही विकासकामे लटकली!

By admin | Updated: October 25, 2014 01:13 IST

अकोलेकरांच्या अपेक्षेवर पाणी; प्रशासन कोणतीही हालचाल करीत नसल्याचे चित्र.

अकोला: आचारसंहिता संपल्यानंतर विकास कामांना सुरुवात होईल, या अकोलेकरांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेले आहे. शहरात मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी प्राप्त २६ कोटी व रस्ते दुरुस्तीसाठी प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातील विकास कामांसंदर्भात प्रशासन कोणतीही हालचाल करीत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कंत्राटदारांची देयके थकीत ठेवल्याने कंत्राटदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. मनपा निवडणुकीच्या कालावधीत शहराची बकाल अवस्था लक्षात घेता, शासनाने मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी २६ कोटींचे अनुदान वितरित केले. हा निधी मार्च २0१३ मध्ये मनपाला प्राप्त झाला. मनपाच्या महासभेत २६ कोटींपैकी ११ कोटी ८५ लाख रुपये पाणीपुरवठा योजना हस्तांतरणासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थातच, १४ कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव तयार केल्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे पाठवला. १२ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी दिली असली तरी नेमकी त्याच दिवशी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे प्रशासनाला विकास कामांच्या निविदा काढणे शक्य नव्हते.याप्रमाणेच केवळ रस्ते दुरुस्तीसाठी शासनाने १५ कोटींचे अनुदान वितरित केले. या अनुदानातून डांबरीकरणाचे १२ व सिमेंटचे ६ असे एकूण १८ रस्त्यांच्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या. सिमेंट काँक्रीटचे सहा रस्ते वगळल्यास इतर रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर २१ ऑक्टोबरपासून विकास कामांना सुरुवात होईल, मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी १८ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले होते.