शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावाने मोडले कापूस उत्पादकांचे कंबरडे

By admin | Updated: February 5, 2015 01:42 IST

दरवाढीच्या प्रतीक्षेत थकलेल्या शेतक-यांनी शेवटी कापूस काढला विकायला.

राजरत्न सिरसाट / अकोला: केंद्रीय कृषी विभागाने हमीभाव जाहीर करताना कापूस उत्पादक शेतकर्‍यांना निराशेच्या गर्तेत टाकले असूून, या हंगामात बाजारातही कापसाचे सरासरी दर हमीदरापेक्षा कमी म्हणजे ३६00 ते ३९00 रुपये प्रतिक्विंटल असल्याने कापूस उत्पादक शेतकरी प्रंचड आर्थिक कोंडीत सापडला आहे. दर वाढतील, या अपेक्षेत असलेल्या शेतकर्‍यांनी अखेर कापूस विक्रीला काढला आहे. पण, खासगी बाजारातही लूट होत असल्याने अग्रिम बोनस द्यावे किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणून शासनाने कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने या खरीप हंगामामील लांब धाग्याच्या कापसाला ४0५0 रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत जाहीर केली आहे. असे असले तरी प्रतवारीचे निकष लावून शेतकर्‍यांकडून कापसाची खरेदी केली जात असल्याने हमीदर ४0५0 असले तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या पदरी प्रतिक्विंटल ३६00 ते ३९00 रुपये येत आहेत. या दरात शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे विदर्भातील कापसाचे क्षेत्र घटत असून, आजमितीस हे क्षेत्र १८ लाखांहून घटून १0 लाख हेक्टरपर्यंत खाली आले आहे. यावर्षी अल्प पावसाचा कापूस पिकावर परिणाम झाल्याने उत्पादन घटले आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी अकोला येथील एका शासकीय सभेत कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रिम बोनस देण्यावर विचार चालू असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेतकर्‍यांचा अपेक्षा वाढल्या होत्या. पण, अग्रिम बोनसचा विचार झाला नसल्याने शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाला आहे. अखेर दरवाढीच्या प्रतीक्षेत घरी ठेवलेला कापूस शेतकर्‍यांनी विक्रीला काढला असून, राज्यात आजमितीस जवळपास १३0 लाख क्विंटल कापसाची खरेदी भारतीय कापूस महामंडळ, कापूस उत्पादक पणन महासंघ आणि खासगी व्यापार्‍यांनी केली आहे.