शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक मार्गात बदल

By admin | Updated: May 14, 2014 23:15 IST

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी असल्याच्या पृष्ठभूमीवर अकोला शहरातील वाहतुकीमध्ये बदल

अकोला: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी असल्याच्या पृष्ठभूमीवर शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. अकोला ते मंगरूळपीर मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक एस.एस. ठाकूर यांनी कळविले आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी खदान परिसरातील सरकारी गोदामांमध्ये होणार असल्याने, रहदारी नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून अकोला ते मंगरूळपीर राज्य मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करून, इतर मार्गांवरून वळविण्यात आली आहे. अकोला ते मंगरूळपीर भागातील नागरिकांसोबतच, खडकी, चांदूर, कौलखेड, खदान भागातील नागरिकांनी शहरात येण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कौलखेड चौक, तुकाराम चौक, गोरक्षण वाय पॉईंट, हुतात्मा चौक, इन्कम टॅक्स चौक, गोरक्षण रोड, अशोक वाटिका चौक मार्गांचा वापर करावा. परतीच्या वेळीसुद्धा याच मार्गाचा वाहनचालक, नागरिकांनी वापर करावा. तसेच लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी गर्दी करणार्‍या राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी आपली वाहने मनपा दक्षता संकुलच्या पाठीमागील भागात पार्क करावीत. जेल चौक ते कौलखेड चौकदरम्यान कोणत्याही वाहनास प्रवेश दिला जाणार नाही. असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक एस.एस. ठाकूर यांनी कळविले आहे.