राष्ट्रीय महामार्गावर बस ट्रक अपघात; दोन जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:30 IST2018-12-05T12:28:37+5:302018-12-05T12:30:46+5:30

बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनभोरा कुष्ठरोग धाम नजीक  एसटी बस व मालवाहू ट्रक या दोन वाहनात अपघात झाला.

Bus Truck Accidents on National Highway; Two injured | राष्ट्रीय महामार्गावर बस ट्रक अपघात; दोन जण जखमी 

राष्ट्रीय महामार्गावर बस ट्रक अपघात; दोन जण जखमी 

ठळक मुद्देया अपघातात दोन्ही चालक जखमी झाले. बस मधील प्रवाशांना किरकोळ इजा झाली.

लोकमत न्युज नेटवर्क 
बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनभोरा कुष्ठरोग धाम नजीक  एसटी बस व मालवाहू ट्रक या दोन वाहनात अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. दरम्यान महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पाहता दिवसा आड छोट्या, मोठ्या अपघाताची मालिका सुरू आहे.  
प्राप्त माहितीनुसार कारंजा आगाराची एसटी बस ( क्रमांक  एम. एच. 40 वाय 5911) बुलढाण्या साठी प्रवासी वाहतूक करत असता अकोला कडून मुर्तीजापुर कडे जाणारा  मालवाहु ट्रक (क्रमांक एम. एच. 19 झेड 9595)समोरील खड्ड्याचा बचाव करण्याच्या प्रयत्नात   नियंत्रण सुटून  होऊन समोरच्या  बसवर आदळला. या अपघातात दोन्ही चालक जखमी झाले. जखमींना उपचारार्थ सामान्य रुग्णालय मुर्तीजापुर येथे दाखल करण्यात आले. बस मधील प्रवाशांना किरकोळ इजा झाली. तर सुदैवाने मोठा अनर्थ टळला. महामार्गावर दिवसाआड होणारे अपघात टाळण्या साठी खड्डे बुजविण्यात यावे अशी वाहन चालकासह सर्व सामान्य जनतेची मागणी होत आहे. 
 

Web Title: Bus Truck Accidents on National Highway; Two injured