शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यात पुन्हा घरफोडी

By admin | Updated: May 6, 2014 22:18 IST

हिवरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत खंडाळा येथे चोर्‍यांचे सत्र सुरूच असून, अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री एका घरात प्रवेश करून २० हजारांचा ऐवज लंपास केला.

२० हजारांचा ऐवज लंपास
खंडाळा : हिवरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत खंडाळा येथे चोर्‍यांचे सत्र सुरूच असून, अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री एका घरात प्रवेश करून २० हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रानुसार, अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री खंडाळा येथील संतोष भेंडे यांच्या घरात प्रवेश केला. कपाट फोडून रोख २० हजार रुपये लंपास केले. दरम्यान, चोरट्यांनी भेंडे यांच्या घरी शेवयावरही ताव मारल्याची माहिती भेंडे यांनी दिली.
खंडाळा गावात एका महिन्यामध्ये पाच ते सहा ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नसल्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत. (वार्ताहर)

ग्राम सुरक्षा दलाची स्थापना
खंडाळा : स्थानिक खंडाळा येथे झालेल्या चोर्‍यांची दखल घेत हिवरखेड पोलिसांनी गावातील नागरिकांची सभा घेऊन यामध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. यामध्ये प्रत्येक रात्री ४ सुरक्षा रक्षक व एक पोलिस कर्मचारी यांनी गावामध्ये गस्त घालून गाव संरक्षण करावे. या कार्यक्रमाला सरपंच सुरेश जाधव, माजी सरपंच बलवंत सांगुनवेढे, गणपत सांगुनवेढे, ग्रा. पं. सदस्य दिनेश खंडेराव, मनोहर किनेकर, डॉ. वर्मा, प्रकाश खंडेराव, ठाणेदार अनंत पूर्णपात्रे, पोउनि. सूर्यवंशी, बिट जमादार दादाराव लिखार, हेकाँ. नागोराव भांगे, देशमुख व नागरिक उपस्थित होते.