शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

बीटी बियाणे तपासणीचे जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाचे अधिकार काढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 10:13 AM

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण अधिकारी यांनी काढलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाईल, असा निरोप देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने त्यांचे वर्षभराचे नुकसान होते, तर कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागतो. ही बाब पाहता बियाणे, खते, कीटकनाशकांच्या नमुन्यांची तपासणी करण्याची जबाबदारी राज्य तसेच जिल्हा परिषदांच्या कृषी विभागावर आहे. प्रत्येक वर्षात कापूस बीटी बियाणे नमुने तपासणी करणाºया जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाचे अधिकार काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अमरावती विभागातील काही अधिकाऱ्यांनी काढलेले नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यासही नकार देण्यात आला आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणीसाठी मुबलक बियाणे मिळणे कठीण होणार आहे. त्याच वेळी गुलाबी बोंडअळीचा धोका पाहता पूर्वहंगामी कापसाची लागवड होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे कृषी आयुक्तांनी बजावले होते. बाजारात आधीच बियाणे उपलब्ध केल्यास शेतकरी पूर्वहंगामी लागवड करण्याची शक्यता मोठी होती. त्यामुळे २५ मेपासून बीटी कापूस बियाणे बाजारात उपलब्ध केले आहे.त्या बियाण्याचे गोदामातून नमुने घेत त्यांची तपासणी पेरणीपूर्व करणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नमुने गोळा केले. ते अमरावती येथील कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी जमा केले; मात्र यावर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण अधिकारी यांनी काढलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाईल, असा निरोप देण्यात आला आहे.त्यामुळे सर्वच जिल्हा परिषदांच्या कृषी अधिकाºयांनी घेतलेले नमुने आता पडून राहण्याची शक्यता आहे. एकट्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाºयांनी काढलेले नमुने मर्यादित असल्याने संपूर्ण बियाणे साठ्याची तपासणी करणे अशक्य होणार आहे. त्यातून शेतकºयांच्या माथी बोगस बियाणे मारले जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. बीटी कापसाची पूर्वहंगामी लागवड रोखण्यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामपातळीवर ही समिती गठित करण्यात आली. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून सरपंच तर सदस्य म्हणून पोलीस पाटील, तलाठी, कृषी सहायक यांचा समावेश आहे. बोगस बीटी बियाण्यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा परिषदांच्या कृषी विभागाचे अधिकार काढण्याचा विरोधाभासही घडत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्र