शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

निकषात अडकली सावकारी कर्जमाफी

By admin | Updated: March 1, 2015 21:16 IST

कर्जदार शेतक-यांच्या संयमाचा सुटतोय बांध; सहकार विभागासह सावकारांकडे विचारणा.

अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्‍यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याची घोषणा गेल्या डिसेंबरमध्ये शासनामार्फत करण्यात आली; मात्र परवानाधारक सावकारांकडून वाटप करण्यात आलेल्या कर्जदारांपैकी कर्जदार शेतकर्‍यांची माहिती अद्यापही शासनाच्या सहकार विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कर्जमाफीचे निकष निश्‍चित होणे बाकी असल्याने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची कर्जमाफी निकषात अडकली आहे. कर्जमाफीच्या घोषणेला तीन महिन्यांचा कालावधी होत असला तरी, प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने, यासंदर्भात कर्जदार शेतकर्‍यांच्या संयमाचा बांध आता सुटू लागला आहे. यासंदर्भात सहकार विभागासह परवानाधारक सावकारांकडे शेतकर्‍यांकडून विचारणा होऊ लागली आहे.राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनामार्फत गत ११ डिसेंबर रोजी सात हजार कोटींचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील दुष्काळग्रस्त १९ हजार ५९ गावांमधील शेतकर्‍यांनी शासकीय परवानाधारक सावकारांकडून शेतकर्‍यांनी घेतलेले कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली. कर्जमाफीच्या घोषणेला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र कर्जमाफीसंबंधीचा शासननिर्णय अद्याप निर्गमित करण्यात आला नाही. परवानाधारक सावकारांकडून कर्जदारांना दिल्या जाणार्‍या पावतीवर कर्जदाराचा व्यवसाय व कर्ज घेण्याच्या प्रयोजनाचा उल्लेख करण्याची तरतूद नाही. त्यामुळे परवानाधारक सावकारांकडे कर्जदार शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध नसल्याने, परवानाधारक सावकारांनी वाटप केलेल्या एकूण कर्जदारांपैकी शेतकरी कर्जदार किती व त्यांनी कोणत्या प्रयोजनासाठी कर्ज घेतले, याबाबतची माहिती शासनाच्या सहकार खात्याकडे उपलब्ध नाही. या पृष्ठभूमीवर कर्जदार शेतकर्‍यांचा शोध घेण्याच्या कामात सहकार खात्याकडून वारंवार विविध मार्गानी माहिती घेतली जात आहे; मात्र माहिती गोळा करण्याच्या या कामात अडीच महिन्यांचा कालावधी निघून गेला; परंतु कर्जमाफीचे निकष आणि अटी-शर्ती अद्यापही निश्‍चित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ दुष्काळग्रस्त कर्जदार शेतकर्‍यांना मिळणे बाकी आहे. त्यामुळे यासंदर्भात कर्जदार शेतकर्‍यांकडून सहकार विभागांतर्गत जिल्हा व तालुका कार्यालयांसह परवानाधारक सावकारांकडे विचारणा केली जात आहे. त्यामध्ये गहाण ठेवलेले दागिणे परत करण्याची मागणीही कर्जदार शेतकर्‍यांकडून सावकारांकडे केली जात आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीचे निकष आणि निर्णय शासनाकडून केव्हा जाहीर होणार व कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान जिल्हा उपनिबंधक ज्ञानदीप लोणारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर्जमाफीसंदर्भात शासननिर्णय अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगीतले. परवानाधारक सावकारांकडील कर्जदारांची विविध प्रकारची माहिती वरिष्ठ कार्यालयांकडून वेळोवेळी मागितली जात आहे. परवानाधारक सावकारांकडील कर्जदारांची मोठी संख्या व त्यांच्या माहितीचे व्यापक आणि क्लिष्ट स्वरूप, यामुळे कर्जदार शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध करून घेण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्टिकरण दिले आहे.*वाद आणि भांडणतंटे!कर्जमाफीची घोषणा शासनाकडून करण्यात आली, या समजातून गहाण ठेवलेले दागिने परत करण्याची मागणी कर्जदार शेतकर्‍यांकडून परवानाधारक सावकारांकडे केली जात आहे. तसेच यासंबंधी अर्ज सहकार विभागाच्या जिल्हा व तालुका कार्यालयांकडे कर्जदार शेतकर्‍यांकडे मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहेत. त्यामध्ये अनेकदा संबंधितांमध्ये वाद आणि भांडणतंट्यांचे प्रसंगही घडत आहेत.