शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

केळीवेळी येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:41 PM

अकोला : आकोट तालुक्यातील केळीवेळी येथे मंगळवार, ३० एप्रिल रोजी स्त्री जातीचे नवजात अर्भक नालीत मृतावस्थेत पडलेले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

अकोला : आकोट तालुक्यातील केळीवेळी येथे मंगळवार, ३० एप्रिल रोजी स्त्री जातीचे  नवजात  अर्भक नालीत मृतावस्थेत पडलेले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.केळवेळी येथील अनिल दिनकर आढे यांच्या घरासमोरच्या नालीत मंगळवारी सकाळी नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. गावात वार्ता पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनिल आढे यांनी यासंदर्भात दहीहांडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.  मृतावस्थेत आढळून आलेले अर्भक कुणाचे असून, तीला नालीत कोणी फेकले, तीला जिवंत असताना फेकण्यात आले, की जीवे मारून फेकण्यात आले, या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळू शकली नाहीत. दहीहांडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३१८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांचे मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक भिलावाकर,  गणेश अवचार, प्रमोद नवलकार करीत आहेत. 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस