शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

उपोषण रद्द करण्यासाठी भाजपाची धावाधाव; प्रभाग क्र. आठमधील नागरिकांची मनधरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 18:24 IST

उपोषण रद्द करण्यासाठी संबंधित नागरिकांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न नगरसेवकांच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे.

अकोला: जुने शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील समस्यांकडे भाजप नगरसेवकांनी पाठ फिरविल्याचा आरोप करीत गजानन नगर व परिसरातील नागरिकांनी १८ सप्टेंबरपासून मनपासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. नागरिकांच्या भूमिकेमुळे पक्षाची बदनामी होण्यासोबतच वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल, या विचारातून सदर उपोषण रद्द करण्यासाठी संबंधित नागरिकांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न नगरसेवकांच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे.महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करताना अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या भौरद ग्रामपंचायतमधील गजानन नगर, लक्ष्मी नगर, आश्रय नगर, राव नगर, मेहरे नगर, अमरप्रीत कॉलनी, राम नगर, पोलीस वसाहत, लुंबिनी नगर आदी दाट लोकवस्तीच्या परिसराचा प्रभाग क्रमांक आठमध्ये समावेश झाला. या प्रभागात मनपाच्या निवडणुकीत चारही उमेदवार निवडून आले. त्यांच्या विजयासाठी या प्रभागात खुद्द भाजपाचे लोकप्रतिनिधी-पदाधिकारी ठाण मांडून होते. प्रभागातील मूलभूत समस्या निकाली काढण्याची जबाबदारी असणाºया भाजप नगरसेवकांनी मागील वर्षभरापासून गजानन नगरमधील गल्ली क्रमांक ३, ४, ५, ६, ७, ८ व ९ कडे ढुंकूनही पाहिले नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत. प्रभागात चालण्यासाठी धड रस्ते नाहीत. पथदिव्यांची समस्या कायम आहे. पाणी पुरवठा होत नाही. सर्वत्र अस्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, साफसफाईसाठी कर्मचारी फिरकत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नागरिकांच्या समस्यांची कोणीही दखल घेत नसल्यामुळे या भागातील महिला, पुरुष व युवकांनी स्वयंस्फूर्तीने डाबकी रोडवर रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. त्यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी प्रभागाची पाहणी करून रस्त्यासाठी मुरूम टाकण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानंतरही प्रभागात कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या नसल्याचा आरोप करीत गजानन नगरवासीयांनी १८ सप्टेंबरपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी मनपासमोर उपोषण छेडल्यास पक्षाची नाहक बदनामी होऊन नगरसेवकांना पक्षातील वरिष्ठांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपच्यावतीने उपोषण छेडणाºया नागरिकांच्या भेटी घेऊन उपोषण रद्द करण्यासाठी त्यांची मनधरणी केली जात असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBJPभाजपा