भाजपने केला राष्ट्रवादीच्या आव्हाड यांचा निषेध; प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जाेडे

By आशीष गावंडे | Updated: May 30, 2024 15:20 IST2024-05-30T15:19:30+5:302024-05-30T15:20:30+5:30

आव्हाड यांच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. 

bjp condemns ncp sharad pawar group jitendra awhad | भाजपने केला राष्ट्रवादीच्या आव्हाड यांचा निषेध; प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जाेडे

भाजपने केला राष्ट्रवादीच्या आव्हाड यांचा निषेध; प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जाेडे

आशिष गावंडे, अकोला: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आराेप करीत  गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जाेडे मारत निषेध व्यक्त केला. खुले नाट्यगृहासमाेर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. 

शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केला जात असल्याचा आराेप करीत राष्ट्रवादीचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी २९ मे राेजी महाड येथील तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दस्तऐवज फाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आव्हाड यांनी डाॅ.आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचा आराेप करीत भाजपचे अनुप धाेत्रे यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. मनुस्मृतीच्या मुद्यावरुन आव्हाड यांच्याकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आराेप यावेळी करण्यात आला.

आंदाेलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापाैर विजय अग्रवाल, सुमन गावंडे, कृष्णा शर्मा, गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा, संतोष पांडे, निलेश निनोरे, रमेश करीहार, दिलीप भरणे, धनजंय धबाले, मनोज साहू, कपिल बुंदेले, उमेश श्रीवास्तव, गोपाल मुळे, तुषार भिरड, चंदा शर्मा, निरंजन अहेरवार, सुनील कांबळे, अभिषेक भगत, चंदू महाजन, राजेश पेंढारी, प्रशांत अवचार, सचिन देशमुख, विक्की ठाकुर आदी सहभागी झाले होते.

Web Title: bjp condemns ncp sharad pawar group jitendra awhad