शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

बिजोत्पादन कार्यक्रमावर होणार साडेआठ लाख खर्च !

By admin | Updated: January 2, 2015 00:31 IST

विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातून सुरूवात.

अकोला: शेतकर्‍यांनी स्वत: दज्रेदार बियाणे निमिर्ती करण्यासाठी बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या प्रशिक्षणाकरीता ८.६0 लाख रू पये खर्च केले जाणार आहेत. सुरू वातीला हा कार्यक्रम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयात राबविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या विदर्भस्तरीय बिजोत्पादन कार्यक्रमाला सुरू वात केली असून,यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या विद्यापीठाला १४.३५ लाखाचा प्रकल्प मिळाला आहे. यातील ८.६0 लाख रू पये बीजोत्पादन प्रशिक्षणावर खर्च केले जाणार आहेत. सुरू वातीच्या टप्प्यात अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयात हा कार्यक्रम राबविला जात आहे. अमरावती जिल्हयातील अचलपूर येथून या प्रशिक्षणाची सुरू वात करण्यात आली आहे. येथे तीन दिवस ५१ शेतकर्‍यांना बिजोत्पादनाची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. येणारी तीन वर्ष चालणार्‍या या कार्यक्रमात खरीप व रब्बी हंगामातील कापूस, तूर, मिरची, टोमॅटो आदी भाजीपाला, फळ पिके तसेच सोयाबीन आणि ज्वारी या पिकांच्या बिजोत्पादनाची माहिती शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. यात बीजप्रमाणी करणाची न्यूनतम मापके, उगवणशक्ती तपासणे, शुध्द बियाणे विलगीकरण, बियाण्यातील भेसळ ओळखण्यासाठीचे विषेश प्रशिक्षण शेतकर्‍यांना देण्यात येत आहे.तसेच पेरणी आणि क्षेत्राची निवड, पेरणी पध्दत,बियाण्यातील भेसळ काढण्याची पध्दत, यावर या प्रशिक्षणात भर देण्यात असून, पीक काढणी आणि मळणीच्यावेळी होणारे नुकसान कसे टाळायचे यासाठी कृषी विद्यापीठाचे विविध विषयाचे विषयतज्ञ शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. कृषी माल शेतातून काढल्यानंतर साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या मुळ विषयाचे ज्ञान शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. स्वत: बियाणे तयार करण्यासाठीची काळजी आणि १९६६ बियाणे कायदाही शेतकर्‍यांना समजावून सांगितला जात आहे. शुध्द बियाणे कूठुन व कसे मिळवावे,प्रतवारी व दर्जा कसा ठरवावा,आदीसंदर्भात माहिती शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. दज्रेदार बिजोत्पादन निर्मीतीसाठी विदर्भातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत असून,तीन वर्ष हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे डॉ.पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी सांगीतले.