शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बेमुदत उपोषणाला बसणार

By admin | Updated: September 7, 2014 23:56 IST

चतारी ते चतारी फाटा रस्त्याची दुदर्शा; जि.प.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.

खेट्री : नजीकच्या चतारी ते चतारी फाटा रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे जि.प.बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सोमवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चतारी ते चतारी फाटा रस्त्यावर खड्डय़ात बसून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव हिरळकर यांनी कार्यकारी अभियंता जि.प.बांधकाम विभाग अकोला यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.चतारी ते चतारी फाटा या २ कि.मी.लांबीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने नागरिकांची कमालीची गैरसोय होत आहे. पातूर तालुक्यात पातूरचे ग्रामीण रुग्णालय हेच चतारी परिसरातील लोकांना जवळ पडते. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णास तातडीने अकोला येथे उपचारासाठी हलवावे लागल्यास याच मार्गाने न्यावे लागते. चतारीच्या लोकांना आठवडीबाजाराकरिता चान्नी येथे तर चतारी, खेट्री, शिरपूर, चांगेफळ येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाडेगाव व चान्नी येथे ये-जा करावी लागते. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या खड्डय़ांमुळे अनेकदा किरकोळ अपघात झाले आहेत. एखादा मोठा अपघात होऊन त्यात प्राणहानी होण्याची शक्यता आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देऊनही दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे हिवरकर यांनी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी सदर रस्त्यावरील खड्डयात उपोषणास बसण्याची भूमिका घेतली आहे.