शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoff Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी लाभार्थी बनले कर्जबाजारी !

By admin | Updated: May 16, 2014 21:42 IST

ग्रामीण भागात गवंडीकामाचे भाव वाढल्याने कमी पैशात घरकुल बांधून देणारे मिळेनासे झाले आहेत.

करतखेडा (अकोला):निराधार व दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना अंमलात आणली आहे. परंतु आता घरकुलाचे स्वप्न साकार होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. ग्रामीण भागात गवंडीकामाचे भाव वाढल्याने कमी पैशात घरकुल बांधून देणारे मिळेनासे झाले आहेत. इंदिरा आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायतने ३२ घरकुलांना मंजुरात दिली आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना दोन टप्प्यात ७० हजार रुपये मिळालेत. २५ हजारांचा तिसरा टप्पा बाकी आहे. घरकुलाचे बांधकाम सुरू आहेत; परंतु दोन खोल्याचे बांधकाम करण्यासाठी गवंडी ५५ ते ६५ हजार रुपये मागत आहेत. गरीब लोकांना घरकुलाच्या बांधकामाचे मोजमाप न समजल्याने लाभार्थी संकटात सापडले आहेत. अर्धवट काम राहील, या भीतीने लाभार्थी हातउसणे करू न पैसा उभा करीत आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ लाभार्थींवर आली आहे. ग्रामीण भागात बहुतांश गावामध्ये हीच स्थिती आहे. घरकुलासाठी मिळणारी रक्कम वाढवून दिल्यास लाभार्थींना या योजनेला लाभ घेता येईल. पैसा नसल्यामुळे अनेकांचे काम अर्धवट स्थितीत अडकले आहे. घरकुलाच्या कामासाठी उसणे दिलेले पैसे लाभार्थी परत करणार नाही, अशी भीती असल्यामुळे कोणीही पैसे देण्यास धजावत नाही. इंदिरा आवास योजनेचा खर्‍या अर्थाने लाभ गरिबांच्या पदरात पडत नाही, हे सत्य आहे. काही गावांमध्ये श्रीमंती लोकांनाही घरकुल मंजूर झालीत. त्यांनी शौचालयाचे थातूरमातूर काम करू न अनुदानाचा लाभ घेतला. मात्र खरे लाभार्थी अनेक गावात वंचित आहेत. घरकुल वाटपाच्या यादीत मोठ्या प्रमाणात राजकारण झाल्यामुळे अनेक गावात लाभार्थींना फटका बसला आहे. करतखेडा येथे नियमानुसारच घरकुलाचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले. या योजनेचा लाभ खर्‍या लोकांना मिळावा व गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यासाठी शासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी, अशी मागणी जोर धरत आहे.