शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक शाखाधिकारी, रोखपाल भीषण अपघातात ठार

By admin | Updated: July 18, 2015 02:22 IST

ट्रकची दुचाकीला धडक; चार तास वाहतूक विस्कळीत.

व्याळा (जि. अकोला): ट्रकने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी येथील बस थांब्यावर घडली. मृतकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे शाखाधिकारी प्रदीप एकनाथ बाजड आणि रोखपाल अमोल भास्कर गावंडे यांचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे व्याळा येथील शाखाधिकारी प्रमोद बाजड आणि रोखपाल अमोल गावंडे हे दोघे शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एमएच-३0-एएच-६७५३ क्रमांकाच्या दुचाकीने व्याळा येथील बस थांब्यावर पोहोचले. ते व्याळा गावाकडे निघाले असताना, रेतीची वाहतूक करीत असलेल्या एमएच-२७ -एक्स-१६0१ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गावंडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला, तर बाजड यांना अकोला येथील रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या भीषण अपघाताची वार्ता परिसरात पसरताच, संतप्त ग्रामस्थांनी बस थांब्यावर धाव घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. येथील बस थांब्यावर गतिरोधक नसल्याने नेहमीच अपघात घडतात. त्यामुळे गतिरोधकाच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. परिणामी महामार्गावर चार तास वाहतुकीची कोंडी झाली होती. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बाळापूर आणि अकोला येथून पोलिसांची जादा कुमक बोलाविण्यात आली होती. तब्बल चार तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.