शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

अकोला शहरातील १० रस्त्यांवर जड वाहतुकीस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:37 PM

अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेली वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी घातली आहे.

अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेली वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी घातली आहे. ४ फेब्रुवारी ते ३ मेपर्यंत ही बंदी राहणार असून, सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत या १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी राहणार आहे. जीवनावश्यक आणि महत्त्वाच्या सेवांची वाहतूक मात्र या रस्त्यांवरून होणार आहे.या १० रस्त्यांमध्ये सिटी कोतवाली पोलीस स्टेशन चौक ते अकोट स्टॅन्ड चौक, दगडी पूल ते माळीपुरा चौक ते बियाणी चौकपर्यंत, अकोट स्टॅन्ड चौकातून सिटी कोतवालीकडे येणारा रस्ता, अकोट स्टॅन्ड चौक ते अग्रसेन चौकाकडे येणारा रस्ता, अग्रसेन चौक ते मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता, टॉवर चौक ते फतेह चौक, रेल्वे स्टेशन मालधक्का ते रामदासपेठ पोलीस ठाण्यासमोरून दामले चौकात येणारा रस्ता, बाळापूर नाका येथून शहरात येणारा रस्ता, वाशिम बायपासकडून शहरात येणारा रस्ता तसेच डाबकी रोड रेल्वे फाटकाकडून शहरात येणाऱ्या रस्त्यावरील जड आणि माल वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामध्ये सदर १० रस्त्यांचा समावेश असून, अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक सेवेच्या जड आणि माल वाहतूक करणाºया वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. या आधी ३ नोव्हेंबर २०१५ ते ३ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत या १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतूक करणाºया वाहनांना बंदी घालण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याकडे व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी अपेक्षा, सूचना व तक्रारी केल्यानंतर या रस्त्यावरील बांधकाम आणि शाळा, महाविद्यालय, बँक, चित्रपटगृहामुळे होणारी गर्दी लक्षात घेता सदर १० रोडवरील जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.- विलास पाटीलवाहतूक शाखा प्रमुख, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा