शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
3
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात होणार दाखल
4
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
5
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
6
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
7
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
8
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
9
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
10
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
11
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
12
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
13
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
14
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
15
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
16
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
17
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
18
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
19
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
20
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हवाला प्रकरणातील आरोपीला जामीन

By admin | Updated: May 14, 2014 19:32 IST

अवैधरीत्या हवालाचा व्यवसाय करणारा आरोपी नीमेश इंद्रवदन ठक्कर याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देत, त्याला जामीन मंजूर केला.

अकोला: अवैधरीत्या हवालाचा व्यवसाय करणारा आरोपी नीमेश इंद्रवदन ठक्कर याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देत, त्याला जामीन मंजूर केला. हवाला प्रकरणाचा तपास आता कोतवाली पोलिसांकडे देण्यात आला आहे. कोतवाली पोलिस हवालातील एवढी मोठी रक्कम कोणाची आहे, त्याचा मालक कोण आहे, याचा शोध घेणार आहे आणि मिळालेल्या माहितीतून शहरातील काही दिग्गज व्यापार्‍यांची नावे आली आहेत. त्यामुळे या दिग्गजांच्या पोलिस मुसक्या आवळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जुना कापड बाजारातील नीमेश ठक्कर याच्या अशोकराज कुरियर सर्व्हिस प्रतिष्ठानावर छापा घालून रोख २७ लाख ७९ हजार ३५0 रुपये आणि टेलिफोन, नोटा मोजण्याची मशीनसह इतर साहित्य जप्त केले. नीमेश ठक्कर हा अवैधरीत्या हवालाचा व्यवसाय करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घालून नीमेश इंद्रवदन ठक्कर याला अटक केली. त्याच्यावर कलम ४१(ड) नुसार गुन्हा दाखल केला होता; परंतु सोमवारी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने सवार्ेपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्याच्याकडून पोलिसांना शहरातील काही दिग्गज हवाला व्यापार्‍यांची नावे प्राप्त झाली आहेत. मंगळवारी दुपारी आरोपी नीमेश ठक्कर याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देत नंतर त्याची जामिनावर मुक्तता केली. आरोपी नीमेश ठक्कर याच्याकडे सापडलेली २८ लाख रुपयांची रक्कम कुणाची, एवढी मोठी रक्कम तो कुठे पाठविणार होता, याचा तपास आता कोतवाली पोलिस करणार आहेत. या प्रकरणामध्ये आणखी किती लोकांची नावे समोर येतात, पोलिस त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.