लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:42 PM2019-08-31T12:42:59+5:302019-08-31T12:43:05+5:30

पोलीस ठाण्यात हजेरी लावावी आणि २५ हजार रुपयांचे हमीपत्र द्यावे, या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Bail to the accused who raped girl | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जामीन

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जामीन

googlenewsNext

अकोला: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप असलेल्या मूर्तिजापूर येथील रितेश वºहेकर नामक आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.
अकोला जिल्ह्यातील एका २२ वर्षीय युवतीला आरोपी रितेश वºहेकर याने मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. काही दिवसांनंतर तिने लग्नाचा तगादा लावला. लग्नास नकार देत असेल तर मी आत्महत्या करणार असल्याची धमकीसुद्धा तरुणीने दिली होती. या प्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपी रितेशने अटकपूर्व जामिनासाठी अकोला न्यायालयात अर्ज दाखल केला होता; मात्र जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांनी आरोपीस जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर रितेश याने उच्च न्यायालयात धाव घेतली. युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीस १ ते ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस ठाण्यात हजेरी लावावी आणि २५ हजार रुपयांचे हमीपत्र द्यावे, या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. प्रीती राणे (नागपूर) अ‍ॅड. नरेंद्र बेलसरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Bail to the accused who raped girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.