सैनिकांच्या नवृत्ती वेतन बँक खात्याला ‘आधार’ची जोड

By Admin | Updated: June 17, 2015 02:01 IST2015-06-17T02:01:41+5:302015-06-17T02:01:41+5:30

सैनिक कल्याण विभागाचा उपक्रम.

Auxiliary basis for the retirement of the soldiers in the bank account | सैनिकांच्या नवृत्ती वेतन बँक खात्याला ‘आधार’ची जोड

सैनिकांच्या नवृत्ती वेतन बँक खात्याला ‘आधार’ची जोड

वाशिम : माजी सैनिक, तसेच विधवांच्या नवृत्तीवेतन बँक खात्याला आधार क्रमांकाची जोड देण्याचा उपक्रम राज्याच्या सैनिक कल्याण विभागाने सुरू केला आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात माजी सैनिक, विधवांना संबंधित बँकेत जाऊन हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) द्यावा लागतो. यावर्षीपासून कोणताही अर्ज न भरता देशातील कोणत्याही शासकीय सुविधा केंद्रात केवळ अंगठा लावून हयातीचा दाखला नोंदविता येणार आहे. माजी सैनिक किंवा त्यांच्या पश्‍चात विधवांना बँकेतून सेवानवृत्तीवेतन दरमहा दिले जाते. त्यासाठी सेवानवृत्त माजी सैनिक किंवा विधवांना ते ह्यजिवंतह्ण असल्याचे प्रमाणपत्र दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संबंधित बँकेला सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र हयातीचा दाखला म्हणून ओळखले जाते. हयातीचा दाखला देण्यासाठी संबंधित सेवानवृत्तीवेतनधारकास बँकेत जाणे बंधनकारक आहे. त्यासाठी वयोवृध्द नवृत्तीवेतनधारकासही बँकेत रांगेत उभे रहावेच लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने बँक खात्याला आधार क्रमांकाची जोड देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नवृत्तीवेतनधारकाने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर डिजिटल जीवन प्रमाणपत्राची (हयातीचा दाखला) नोंदणी करुन दिली जाणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बँक खात्याला आधार क्रमांक जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ), आधार कार्ड, नवृत्तीवेतन घेत असलेले बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरून देणे आवश्यक आहे. या नोंदणीनंतर जीवन प्रमाणखाते असलेले प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याही शासकीय सुविधा केंद्रांवर केवळ अंगठा लावून हयातीचा दाखला नोंदविता येणार आहे. त्यासाठी कोणताही अर्ज भरण्याची गरज राहणार नाही.

Web Title: Auxiliary basis for the retirement of the soldiers in the bank account