दिग्रस बू. (अकोला) : गावंडगाव शिवारात मंगळवारी (३ मार्च) पहाटेच्या सुमारास ऑटो उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पांगरताटी येथील काही मजूर कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी एमएच १९ एई ८४२९ क्रमांकाच्या ऑटोने निघाले होते. गावंडगाव मार्गावरील पुलाजवळ ऑटोचालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो अचानक उलटला. या अपघातात प्रवासी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच गावंडगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असलेले राजू दामू जाधव (रा. पांगरताटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी चान्नी पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Auto overturned: One dead, two women injured in Gavandgaon.
Web Summary : Near Gavandgaon, an auto accident resulted in one death and two injuries. The auto overturned after the driver lost control. Injured were rushed to the hospital; Raju Jadhav died during treatment. Police are investigating.

Web Title : ऑटो पलटा: एक की मौत, दो महिलाएं घायल
Web Summary : गावंडगांव के पास ऑटो पलटने से एक की मौत, दो घायल। चालक के नियंत्रण खोने से ऑटो पलटा। घायलों को अस्पताल पहुंचाया गया; राजू जाधव की इलाज के दौरान मौत। पुलिस जांच कर रही है।
Web Summary : गावंडगांव के पास ऑटो पलटने से एक की मौत, दो घायल। चालक के नियंत्रण खोने से ऑटो पलटा। घायलों को अस्पताल पहुंचाया गया; राजू जाधव की इलाज के दौरान मौत। पुलिस जांच कर रही है।