शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहाच्या वादातून युवकावर हल्ला

By admin | Updated: February 11, 2015 01:22 IST

अकोल्यातील घटना; गुन्हा दाखल.

अकोला: अज्ञात आरोपींनी देशमुख फैलात राहणारा आनंद चंदू गयले (२२) याच्यावर फावड्याने जबर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळील रस्त्यावर घडली. जखमी युवकाला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आनंदवर झालेला हल्ला, प्रेमविवाहाच्या वादातून झाल्याचे बोलले जाते. देशमुख फैलामध्ये राहणारा आनंद गयले हा युवक रामदासपेठेतील डॉ. दीपक केळकर यांच्या रुग्णालयामध्ये सहा वर्षांंपासून वॉर्डबॉय म्हणून काम करतो. आनंद हा मोटारसायकलने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरून जात असताना, त्याला चार ते पाच युवकांनी अडवून त्याचेवर फावड्याने जबर वार केले आणि आरोपी पळून गेले. यात आनंद हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून, त्याचेवर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयामध्ये साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, रामदासपेठचे पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांनी त्याच्या प्रकृतीची चौकशी केली आणि घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आनंदवर झालेला हल्ला हा प्रेमविवाहातून तर झालेला नाही ना, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी उशिरा रात्री अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.