शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामांचे ‘टार्गेट’ गाठण्यासाठी ‘आशां’ची मदत

By admin | Updated: April 4, 2015 01:58 IST

अकोला जिल्हा परिषदेची संकल्पना; गावागावांत करणार जनजागृती.

संतोष येलकर/अकोला: स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामांचे ह्यटार्गेटह्ण पूर्ण करण्यासाठी गावोगावी आशा सेविकांची मदत घेतली जाणार आहे. त्या ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करणार आहेत. आशा सेविकांच्या सक्रिय सहभागातून शौचालय बांधकामांसाठी खेडोपाडी व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन अकोला जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २0१५-१६ या वर्षात अकोला जिल्ह्यात ४९ हजार शौचालयांचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने निश्‍चित केले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी शौचालयाचे महत्त्व ग्रामस्थांना सांगण्याची आणि त्यासंदर्भात त्यांच्यात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या आशा सेविकांकडून आरोग्य शिक्षणासह लसीकरण, अँम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे व इतर प्रकारची कामे केली जातात. ग्रामस्थांना आरोग्यासंबंधी विविध योजनांची माहिती देण्याचे काम आशा सेविकांकडून प्रभावीरीत्या केले जाते. त्यानुषंगाने स्वच्छ भारत अभियानात शौचालय बांधकामाचे ह्यटार्गेटह्ण पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार ५0 आशा सेविकांची मदत घेण्यात येणार आहे. गावागावांमध्ये महिला व पुरुषांच्या बैठका घेऊन, शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून देत यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे काम या आशा सेविका करतील. शौचालय बांधकामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ही संकल्पना जिल्हा परिषद प्रशासन राबविणार आहे. शौचालय बांधकामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आशा सेविकांची मदत घेण्याची संकल्पना राज्यात पहिल्यांदा अकोला जिल्हा परिषदेनेच मांडली आहे. *महिलांच्या प्रबोधनातून मिळेल उद्दिष्टपूर्तीला चालना! स्वच्छ भारत अभियानात शौचालयांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आशा सेविका गावागावांमध्ये महिलांच्या बैठका घेणार आहेत. त्या माध्यमातून शौचालय बांधकामांसंबधी महिलांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील शौचालयांच्या बांधकामाला मोठय़ा प्रमाणात चालना मिळणार आहे.