शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांना दिलासा; अनेक दिवसांपासून पावसाची होती प्रतिक्षा

By रवी दामोदर | Updated: July 6, 2024 17:03 IST

जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात विखुरत्या स्वरूपाचा पाऊस असल्याने काही भागात पेरण्या आटोपल्या असून, पिके शेतात डोलत आहे.

अकोला : मृग नक्षत्रानंतर आर्द्रातही पावसाने हुलकावणी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जुलै महिन्याला सुरुवात होऊनही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतीत होता. शनिवार, दि.६ जूलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने आगमन केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. अद्यापही काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

   जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात विखुरत्या स्वरूपाचा पाऊस असल्याने काही भागात पेरण्या आटोपल्या असून, पिके शेतात डोलत आहे. गत आठ दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शनिवारी अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे, तसेच आगामी पाच दिवस पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने  वर्तविल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात पावसाची शक्यता

नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात ११ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता दर्शविली आहे. पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी नदीमध्ये, नाल्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये व पूर पाहण्यासाठी नदी-नाला काठावर जाऊ नये. वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.