माझा रावण दहनाला आधीपासूनच विरोध, पण आज स्टेटमेंट देणार नाहीः प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 15:05 IST2023-10-24T15:05:34+5:302023-10-24T15:05:58+5:30

माझा रावण दहनाला आधीपासूनच विरोध आहे. आज काही नवीन नाहीय. आज आनंदाचा दिवस आहे. - प्रकाश आंबेडकर

Arrest Mohan Bhagwat, Modi; both criminals of this country's Arm Act; Prakash Ambedkar's demand | माझा रावण दहनाला आधीपासूनच विरोध, पण आज स्टेटमेंट देणार नाहीः प्रकाश आंबेडकर

माझा रावण दहनाला आधीपासूनच विरोध, पण आज स्टेटमेंट देणार नाहीः प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर आर्म ऍक्ट खाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

माझा रावण दहनाला आधीपासूनच विरोध आहे. आज काही नवीन नाहीय. आज आनंदाचा दिवस आहे. त्यावर मी कोणतेही वाईट स्टेटमेंट देणार नाही. हा आनंदाचा दिवस आनंदाने साजरा व्हावा, त्यासाठी मी आज काही बोलणार नाही. जे काही बोलायचं ते उद्या बोलू, असे आंबेडकर म्हणाले. 

तसेच मोहन भागवत आणि मोदी हे ते दोघेही आर्म ऍक्टचे गुन्हेगार आहेत. ते जे काही शस्त्र बाळगतात, ते सैन्याच्या काहीच जवानांना मिळतात. ते इतरांना मिळत नाही. त्यामुळे मोहन भागवत आणि मोदी हे दोघेही या देशाचे आर्म ऍक्टचे गुन्हेगार आहेत. त्यामुळे आर्म ऍक्ट खाली त्यांना अरेस्ट करावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. 

Web Title: Arrest Mohan Bhagwat, Modi; both criminals of this country's Arm Act; Prakash Ambedkar's demand