शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ॲप्पल बोर शेतीतून शोधला उन्नतीचा मार्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST

रवी दामोदर अकोला: योग्य नियोजन व मेहनतीच्या भरवशावर खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्याने ॲप्पल बोरची शेती फुलवली आहे. ही किमया सांगळूद येथील ...

रवी दामोदर

अकोला: योग्य नियोजन व मेहनतीच्या भरवशावर खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्याने ॲप्पल बोरची शेती फुलवली आहे. ही किमया सांगळूद येथील शेतकरी गणेश विश्वनाथ राऊत यांनी केली असून, कमी खर्चात फायदेशीर शेती करून उन्नतीचा मार्ग शोधला आहे. राऊत यांनी लागवड केलेले बोराची शेती आता सद्यस्थितीत फळाला आली असून, इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

दरवर्षी वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे खरीप हंगामात होणारे नुकसान व शेतकऱ्यांना मिळत असलेला कमी भाव यामुळे गणेश राऊत यांनी पारंपरिक शेतीला बगल देण्याचा निश्चय केला. शेतीमध्ये काहीतरी वेगळे करून दाखविण्याच्या ध्यासापोटी ते विविध कृषी प्रदर्शन फिरले. नागपूर येथील कृषी प्रदर्शनात राऊत यांच्या डोक्यात ॲप्पल बोराची शेती करण्याचा विचार आला. त्यानंतर त्यांनी ॲप्पल बोर शेतीविषयी विविधांगी माहिती घेऊन सांगळूद शिवारात दीड एकरात पेरणी करण्याची तयारी केली. सुरुवातीला बियाण्यासाठी ठिकठिकाणी नर्सरीत चकऱ्या मारल्या. विविध ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर २०१७ मध्ये पेरणी १३ बाय १० फुट अंतरावर ॲप्पल बोरच्या रोपांची पेरणी केली. दीड एकरात त्यांनी जवळपास ४५० झाडे जगविली. सद्यस्थितीत झाडे बोरांनी लदबदलेली आहेत. दोन महिन्यात ॲप्पल बोरचे उत्पन्न घेतले जाते. दरवर्षी दीड एकरात गणेश राऊत यांना ११० क्विंटल उत्पन्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. (फोटो)

----------------------------------------

ग्राहकांपर्यंत थेट विक्री

खारपाणपट्ट्यात ॲप्पल बोरचा प्रयोग यशस्वी करीत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने गणेश राऊत यांच्यापुढे मालाची विक्री करण्याचे मोठे संकट उभे होते. त्यांनी हार न मानता ग्राहकांच्या थेट घरी जात विक्री केली. सुरुवातीला आठवडी बाजार, तालुक्याचे ठिकाण आदी ठिकाणी जात त्यांनी ॲप्पल बोरची विक्री केली. सुरुवातीला अडचणी आल्या; मात्र संकटे पार करीत त्यांनी ग्राहकांपर्यंत माल पोहोचलविला. आता काही ग्राहक त्यांच्या शेतात भेट येऊन बोर विकत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत चारचाकी वाहनांतून ग्राहकांपर्यंत थेट विक्री करीत असल्याचे चित्र आहे.

--------------------------------------------------------------------

अनेकांना मिळाला रोजगार

बोर तोडणीपासून ते विक्री पर्यंत अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. गणेश राऊत यांच्याकडे सद्यस्थितीत चार ते पाच पुरुष मजूर व चार ते पाच महिला मजूर असे १० ते १५ मजूर हे दररोज काम करीत आहेत. याचबरोबर त्यांना कुटुंबाची मदत होत असून, विक्रीसाठी माल तयार करण्याकरिता अवघे कुटुंब राबत असल्याचे चित्र आहे.

--------------------------------------------------------------------

पारंपरिक शेती ही तोट्याची झाली आहे तसेच युवकांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे युवा शेतकऱ्यांनी पुढाकार घेत वेगळे प्रयोग राबवून उन्नती साधावी. शासनाने पुढाकार घेत युवकांना मार्गदर्शन करावे.

- गणेश राऊत, शेतकरी, सांगळूद.